कपाशीला ‘ठिबक’ चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2015 02:05 AM2015-07-17T02:05:46+5:302015-07-17T02:05:46+5:30
अवर्षण सदृश स्थितीच्या सावटाखाली असलेल्या वर्धा तालुक्यात ४६ हजार ६४३ हेक्टर पेरणी झालेली आहे.
उगविलेले अंकुर करपण्याच्या मार्गावर : दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
वर्धा : अवर्षण सदृश स्थितीच्या सावटाखाली असलेल्या वर्धा तालुक्यात ४६ हजार ६४३ हेक्टर पेरणी झालेली आहे. पावसाने दडी मारल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. असे असतानाच निसर्गाच्या प्रतिकुलतेवर मात करण्याकरिता ४४९ शेतकऱ्यांनी ५६९ हेक्टरावर ठिबक सिंचनाचा प्रयत्न सुरू केला आहे.
उपलब्ध असलल्या मर्यादित पाण्याचा वापर करीत निसर्गाच्या प्रतिकुलतेवर मात करण्याचा या माध्यमातून प्रयत्न होत आहे. वर्धा तालुक्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य असून अपवादात्मक स्थितीत तालुक्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी यापैकी ४६ हजार हेक्टरवर पेरणी केलेली आहे. त्यापैकी २६ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. त्यामुळे आर्थिक पीक म्हणून समजल्या गेलेल्या कपाशीला जगवण्याचा प्रयत्न सध्या शेतकरी कसोशीने करीत आहेत. परिणामी ५६९ हेक्टर वरील कपाशी अवर्षण सदृश स्थितीतही असल्याचे चित्र आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा आधार मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)
तालुक्यात ५६ पैकी ४६ हजार हेक्टरवर पेरण्या
जिल्ह्यात असलेल्या ५६ हजार हेक्टरपैकी ४६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात कपाशी २६ हजार ९१० हेक्टर, सोयाबीन १३ हजार ४७० हेक्टर, ज्वारी, मका १२७ हेक्टर, तूर ६ हजार ७६ हेक्टर, मुग ३० हेक्टर, उडीद ३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात अजून १० हजार हेक्टर पेरा व्हायला आहे.
तीन वर्षांपासून वर्धा तालुक्यातील ४४० शेतकरी ५६९ हेक्टरवर ठिंबक सिंचनाने ओलीत करीत आहेत. तर १ हजार ७८७ हजार शेतकरी १ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर स्प्रिंकलरचा वापर करून ओलीत करीत आहेत.
वर्धा तालुक्यातील ठिंबक व स्प्रिंकलरची स्थिती
ठिबक सिंचन २०१२-१३शेतकर ११४१४४ हेक्टर क्षेत्र
स्प्रिंकलर २०१२-१३शेतकरी ४५२११७ हेक्टर क्षेत्र
ठिबक सिंचन २०१३-१४शेतकरी १२३१६३ हेक्टर क्षेत्र
स्प्रिंकलर २०१३-१४शेतकरी ६४०५४५ हेक्टर क्षेत्र
ठिबक सिंचन २०१४-१५शेतकरी २०३२६२ हेक्टर क्षेत्र
स्प्रिंकलर २०१४-१५शेतकरी ६९५५३६ हेक्टर क्षेत्र