व्यवसायाभिमुखतेतून कुटुंब सावरायला सक्षम व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:04 PM2019-02-25T22:04:39+5:302019-02-25T22:04:57+5:30

शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या गोष्टीचे प्रशिक्षण मिळाले की, ती गोष्ट महिला अत्यंत गंभीरपणे मनावर घेतात आणि व्यवसाय म्हणून त्याचा विचार करतात. वामनराव दिवे ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांनी सक्षम व्हावे, असे आवाहन मराठी मालिकेतील अभिनेत्री अनिता दाते (राधिका) हिने येथे केले.

Be able to save family through business oriented | व्यवसायाभिमुखतेतून कुटुंब सावरायला सक्षम व्हा

व्यवसायाभिमुखतेतून कुटुंब सावरायला सक्षम व्हा

Next
ठळक मुद्देअभिनेत्री अनिता दाते : वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहमिलन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या गोष्टीचे प्रशिक्षण मिळाले की, ती गोष्ट महिला अत्यंत गंभीरपणे मनावर घेतात आणि व्यवसाय म्हणून त्याचा विचार करतात. वामनराव दिवे ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांनी सक्षम व्हावे, असे आवाहन मराठी मालिकेतील अभिनेत्री अनिता दाते (राधिका) हिने येथे केले.
येथील भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमवर शनिवारी आयोजित मकरसंक्रांत स्नेहमिलन व हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला सुमारे १० हजारांवर महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे होते. ट्रस्टच्या अध्यक्ष पुष्पलता दिवे, मदत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जोशी, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना वानखेडे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, आरोग्य सभापती रामू राठी, माजी नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित, भाजप शहर अध्यक्ष विनय डोळे, कमल कुलधरिया, गौरव जाजू, नगरसेविका उषा सोनटक्के, गंगा चकोले, वाघमारे, कनिजाबी परवीनबी, प्रतिभा गिरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन स्मिता खंगाई यांनी केले. धनश्री दिवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सागर निर्मल, आसिफ खान, अविनाश भुसाटे, समीर साबळे, साई ग्रुप आणि शिवणकला प्रशिक्षणार्थी महिलांनी सहकार्य केले.
लकी ड्रॉच्या मानकरी
उज्ज्वला किरपाने (जनतानगर), सायमा परवीन कय्युम खान (हनुमान वॉर्ड), दुर्गा मेहरे (मेहरनगर), प्रगती लाड (श्रीराम वॉर्ड), अफरीन कौसर शेख शकील (बालाजी वॉर्ड), अंजुम शेख शकील (आंबेडकर वॉर्ड), अश्विन गोधने (खर्डी वॉर्ड), अल्फी अंजुम शेख मेहमूद (आंबेडकर वॉर्ड), सारिका घाडगे, शालिनी मुरदकर (माळगण वॉर्ड), वर्षा झटाले (जनतानगर), तबस्सुम बानो महम्मद रफीक (वलीसाहेब वॉर्ड), तृप्ती वडनारे (दत्त वॉर्ड), ममता कडू (महाराणा प्रताप वॉर्ड), सीमा जवंजाळ, हर्षा कठाणे (बाजारवाडा), योगिता धोंगडी, गुड्डी एकापुरे (बेढोणा), नीलिमा पाटील, अफरीन परवीन रऊफ खान, पुष्पा साठे, शहेनाज परवीन शेख शब्बीर, पुष्पा धुर्वे, नाजिदा परवीन फिरोजखान, सुनीता गुल्हाणे, वैशाली खिलोसिया, आरती पोकळे, आजमिन परवीन रफीक अली, वनिता माहोरे यांना ‘लकी ड्रॉ’मध्ये शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

Web Title: Be able to save family through business oriented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.