नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर दक्षता बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:19+5:30
आरोग्य विभागाने कोरोना सोबतच इतरही रुग्णांची नियमित तपासणी करावी व कोरोना रोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी लागणारे साहित्य आमदार निधीतून लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे, असेही आमदारांनी निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता नियम पाळणे आवश्यक आहे. सिंदी (रेल्वे) हे गाव हिंगणघाट मतदार संघातील अगदी टोकावरचे गाव, नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असल्याने भविष्यात वर्धा जिल्ह्यात या रोगाचा शिरकाव होऊ नये याची खबरदारी म्हणून हिंगणघाट मतदार संघाचे आमदारसमीर कुणावार यांनी तहसीलदार महेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, न. प. मुख्याधिकारी कैलास झंवर, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत मोफत तांदूळ वाटपाची स्थिती तहसीलदार सोनवणे यांनी जाणून घेतली. ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नाही, अशांनासुद्धा रेशन उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदारांनी दिले. तसेच नागपूरवरून येणार सर्व रस्ते सीमाबंदी करून बंद करण्यात यावे व योग्य कारणाशिवाय नागपूर किंवा इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोणतेही नागरिक येणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांना निर्देश देण्यात आले.
आरोग्य विभागाने कोरोना सोबतच इतरही रुग्णांची नियमित तपासणी करावी व कोरोना रोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी लागणारे साहित्य आमदार निधीतून लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे, असेही आमदारांनी निर्देश दिले. गरजू व निराधार व्यक्तीला आवश्यकता भासत असल्यास संपर्क साधून त्यांच्याकरिता धान्याची किट उपलब्ध करून देण्यात येईल व आपल्या मतदार संघात कुणीही उपासमारीचा बळी ठरू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले