इंटरनेटवर वैयक्तिक माहिती अपलोड करताना काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:00 AM2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:10+5:30

उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप पुढे म्हणाले, जबाबदार नेटीझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना सुरंक्षित सायबर पद्धतीविषयी माहिती मिळेल, असे ते म्हणाले. यावेळी ठाणेदार महेंद्र इंगळे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून बदलत्या गुन्हेगारीचे स्वरूप आणि फसवणुकीबाबत माहिती दिली.

Be careful when uploading personal information over the Internet | इंटरनेटवर वैयक्तिक माहिती अपलोड करताना काळजी घ्या

इंटरनेटवर वैयक्तिक माहिती अपलोड करताना काळजी घ्या

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । पीयूष जगताप, ‘सायबर सेफ वुमेन’ मोहिमेचा प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डिजिटल युगात इंटरनेटचा दैनंदिन जीवनात मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. इंटरनेट हे उत्तम साधन असले तरीही आपण इंटरनेटवर अपलोड करीत असलेल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेटवर वैयक्तिक माहिती अपलोड करताना सुरक्षाविषयक काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सायबर सेफ वुमन मोहिमेंतर्गत आशीर्वाद मंगल कार्यालयात पोलीस विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या वतीने संयुक्तरीत्या महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, माहिती अधिकारी मनीषा सावळे, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गांवडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, प्रकाश खंडार, अमर लाखे यांची उपस्थिती होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप पुढे म्हणाले, जबाबदार नेटीझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना सुरंक्षित सायबर पद्धतीविषयी माहिती मिळेल, असे ते म्हणाले. यावेळी ठाणेदार महेंद्र इंगळे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून बदलत्या गुन्हेगारीचे स्वरूप आणि फसवणुकीबाबत माहिती दिली. बँक खात्याशी संबंधित एटीएम पिन, ओटीपी, सीव्हीव्ही नंबर कुणालाही देऊ नये, नोकरीचे प्रलोभन, लॉटरी, एखादी वस्तू कमी किमती उपलब्ध करून देणे, विवाहविषयक साईटवरील प्रलोभने आदींच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशी माहिती देणारे फोन, एसएमएस किंवा ई-मेल आल्यास त्याची माहिती तत्काळ सायबर सेलकडे द्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाला बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, दक्षता समितीचे नीलेश खंडारे, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी, महाविद्यालय, शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्र उपस्थित होते. संचालन मारोती नगराळे यांनी केले.
देवळी येथील भोंग सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, उपविभागीय पोलीस अधिकारी तृृप्ती जाधव, सहा़यक पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, नगरसेविका बकाणे, ताडाम, अंगणवाडी सेविका, प्रतिष्ठित नागरिक, शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, पोलीस मित्रासह साडेचारशे विद्यार्थी उपस्थित होते.
संचालन प्रा. प्रशांत कुमरे यांनी केले़ कार्यशाळा आयोजनाकरिता सायबर सेलचे कर्मचारी दिनेश बोथकर, नीलेश कट्टोजवार, अनुप कावळे, अक्षय राऊत यांनी सहकार्य केले.

Web Title: Be careful when uploading personal information over the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.