वाचनाने समृद्ध व बोलके होण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतिशील झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:52 PM2018-12-23T23:52:06+5:302018-12-23T23:52:46+5:30

वाचनाने माणसे समृद्ध होतात. माणसे बोलकी होतात; पण केवळ उत्कृष्ट बोलून चालणार नाही ती कृतिशील झाली पाहीजे. साहित्य निर्मिती करणाऱ्यांनी साहित्यावर बोलले पाहिजे. शिवाय आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली पाहिजे.

Be educated rather than enriching and speaking by reading | वाचनाने समृद्ध व बोलके होण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतिशील झाले पाहिजे

वाचनाने समृद्ध व बोलके होण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतिशील झाले पाहिजे

Next
ठळक मुद्देशेख हाशम : ग्रंथोत्सव व ग्रंथजत्रा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाचनाने माणसे समृद्ध होतात. माणसे बोलकी होतात; पण केवळ उत्कृष्ट बोलून चालणार नाही ती कृतिशील झाली पाहीजे. साहित्य निर्मिती करणाऱ्यांनी साहित्यावर बोलले पाहिजे. शिवाय आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली पाहिजे. आपला समाज बोल घेवड्यांचा नाही तर कर्तृत्वान कार्यकर्त्यांचा बनला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य शास्त्राचे अभ्यासक व लेखक प्रा. शेख हाशम यांनी ग्रंथोत्सव व ग्रंथजत्रा कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात केले.
व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, ग्रंथालय संघाचे कार्यवाह डॉ. गजानन कोटेवार, जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे, सुधीर गवळी, अरुणकुमार हर्षबोधी यांची उपस्थिती होती.
शासकीय ग्रंथालयात असणाºया अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी घडले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करुन सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत झाले आहेत. म्हणुनच ज्ञानार्जनाची संधी देणारी ही ग्रंथालये व अभ्यासिका समृद्ध झाल्या पाहिजे असेही हाशम यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त केलेल्या सावंगी (मेघे) येथील विदर्भ ग्रामीण विकास ग्रंथालयाचा सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय जिल्हा ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन शासनाच्या विविध विभागात नियुक्ती मिळालेले विद्यार्थी मंगेश निकोडे, सुप्रिया खैरकर, सतीश सीरसे, प्रवीण धनवीज, पीयूष कांबळे, शैलेश चव्हाण, अमोल सोनटक्के, विजय तुरणकर, मनोज फलमाळी, पंकज पानतावणे, दीपक बोंबले, अमर नगराळे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुषमा पाखरे यांनी केले तर आभार अरुणकुमार हर्षबोधी यांनी मानले.

Web Title: Be educated rather than enriching and speaking by reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.