आमदार संघावर पत्रकार संघाची ५ धावांनी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:28 PM2018-12-08T21:28:41+5:302018-12-08T21:30:03+5:30

सीएम चषक स्पर्धेतील शनिवारी पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात पत्रकाराच्या संघाने आमदार संघाचा पाच धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. सदर सामन्यात किशोर मानकर हे सामनावीर ठरले.

Beat the journalists' team by 5 runs on the MLA team | आमदार संघावर पत्रकार संघाची ५ धावांनी मात

आमदार संघावर पत्रकार संघाची ५ धावांनी मात

googlenewsNext
ठळक मुद्देसीएम चषक स्पर्धा : किशोर मानकर सामनावीर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सीएम चषक स्पर्धेतील शनिवारी पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात पत्रकाराच्या संघाने आमदार संघाचा पाच धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. सदर सामन्यात किशोर मानकर हे सामनावीर ठरले.
आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाचे कर्णधार प्रशांत देशमुख व आमदार संघाचे कर्णधार निलेश किटे यांनी नाणेफेक केली. आमदार ११ चे कर्णधार निलेश किटे यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार ११ च्यावतीने डावाची सुरुवात रुपेश खैरी व अतुल केळकर यांनी केली; पण गौरव मेघे यांनी पहिल्याच चेंडूवर केळकर यांचा बळी घेत त्यांना तंबूत परत पाठविले. त्यानंतर चेतन वाघमारे फलंदाजिला उतरले. त्यांनी पहिल्याच बॉलवर षटकार खेचत प्रक्षकांकडून कौतुकाची थाप मिळविली. दरम्यान रुपेश खैरी यांना विकेटकिपर वरूण पाठक यांनी स्टम्पिंग करीत आऊट केले. यानंतर १२ धावा काढुन वाघमारे बाद झाले. अजय कुमार व हेमंत गौळकर यांनी संघाचा डाव सावरला; पण अजय कुमार ५ धावा काढून बाद झाले. गजानन गावंडे व हेमंत गौळकर यांनी डाव सावरला. गौळकर यांनी फटके मारत धाव फलक हलता ठेवला. १४ धावांवर ते बाद झाले. त्यानंतर किशोर मानकर यांनी तडाखेबाज फटके लावत पत्रकार संघाची धावसंख्या १० षटकात ८६ वर पोहचवली. मानकर २८ धावा काढून तर गजानन गावंडे १७ धावा काढून नाबाद राहिले. आमदार ११ च्यावतीने फलंदाजीची सुरुवात नगरसेवक गोपी त्रिवेदी व वरूण पाठक यांनी केली. गोपी त्रिवेदी सात धावा काढून बाद झाले. तर अमित पठाण चार धावावर बाद झाले. पवन राऊत व वरूण पाठक यांनी डाव सावरला. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात राऊत धावबाद झाले. विपीन राऊत यांनी त्यानंतर फलंदाजी करीत सामन्यात रंगत आणली. अंतिम षटकात आमदार ११ ला २७ धावांची गरज होती. विपीन खत्री यांनी ३ षटकार व एक चोका खेचला. तरीही पाच धावांनी आमदार ११ चा पराभव झाला. आमदार ११ कडून गौरव मेघे, अतुल तराळे, प्रदिप ठाकरे, विपीन खत्री, अमित पठाण यांनी तर पत्रकार संघकडून हेमंत गौळकर, चेतन वाघमारे, किशोर मानकर, प्रशांत देशमुख, अतुल केळकर, गजानन गावंडे यांनी गोलंदाजी केली. पत्रकारांच्या संघात प्रशांत देशमुख, किशोर मानकर, गजानन गावंडे, प्रवीण धोपटे, रुपेश खैरी, चेतन वाघमारे, अजय कुमार, हेमंत गौळकर, अतुल केळकर, दिलीप भुजाडे, मनोज गुप्ता तर आमदारांच्या संघात निलेश किटे, अतुल तराळे, नौशाद शेख, प्रदिप ठाकुर, प्रदीप ठाकरे, वरुण पाठक, गौरव मेघे, पवन राऊत, विपीन खत्री, अमित पठाण, गोपी त्रिवेदी, मनीष सुरजूसे यांचा समावेश होता. पंच म्हणून महेश झाटे, रुपेश डायगव्हाणे यांनी काम पाहिजे. यशस्वीतेसाठी सुमित गांजरे, अभिषेक त्रिवेदी, रजत शेंडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Beat the journalists' team by 5 runs on the MLA team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.