बाबासाहेबांच्या स्मृती स्थळाचे होणार सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:56 PM2018-11-06T23:56:32+5:302018-11-06T23:57:22+5:30

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम मुळ गावातील समाज बांधवांशी संवाद साधला होता.ते ज्या ठिकाणी दगडावर बसले होते त्या स्थळाचे सौदर्र्यीकरण करण्यात येणार आहे.

Beautification of Babasaheb's memory will be done | बाबासाहेबांच्या स्मृती स्थळाचे होणार सौंदर्यीकरण

बाबासाहेबांच्या स्मृती स्थळाचे होणार सौंदर्यीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईवरून स्केच प्राप्त : घटनाकारांच्या सेवाग्राम भेटीला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम मुळ गावातील समाज बांधवांशी संवाद साधला होता.ते ज्या ठिकाणी दगडावर बसले होते त्या स्थळाचे सौदर्र्यीकरण करण्यात येणार आहे. त्यांचे स्केच मे. अडारकर असोसिएट मुंबई यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरपंच रोशना जामलेकर यांना प्राप्त झाले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचा मसूदा तयार करण्याचे काम करीत असताना महात्मा गांधीजीशी चर्चा करण्यासाठी १ मे १९३६ मध्ये सेवाग्राम येथील आश्रमात आले होते. त्यावेळी सायंकाळी आश्रमची प्रार्थना झाल्यानंतर मूळगावातील समाज बांधवांशी चर्चा करून संवाद साधला. बाबासाहेबांनी शिक्षणावर मार्गदर्शन केले. यासह आरोग्य, स्वच्छता आणि आचार विचारावर विशेष भर दिला. जुन्या वस्तीतील अ. भा. बौध्द महासभा समितीतंर्गत परिसरात बाबासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे. बाजूला बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा असून विहार पण आहे. त्या ठिकाणाचे सांैदर्यीकरण करण्यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखडा बैठकीत सेवाग्रामच्या सरपंच रोशना जामलेकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचा मुद्दा ठेवला होता. यात पथदिवे, रस्ता ,नाली, गुट्टू आदीची मागणी होती. मे.अडारकर असोसिएटने सांैदर्यीकरणाचे स्केच तयार करून पाठविले आहे. समितीच्या लोकांशी चर्चा होईल, असे जामलेकर यांनी सांगितले.

Web Title: Beautification of Babasaheb's memory will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.