पारितोषिकाचे मूल्य न पाहता उत्कृष्ट क्रीडापटू व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:55 PM2018-01-17T23:55:53+5:302018-01-17T23:56:19+5:30

स्पर्धा ही मोठी असो की लहान, खेळाडूने खेळत राहिले पाहिजे. त्यातूनच आपण उत्कृष्ठ खेळाडू होऊ शकतो. एक मल्ल म्हणून आपण स्वत: मागील कित्येक वर्षापासून लाल मातीच्या मैदानात खेळलो.

Become the best athlete without the prize value | पारितोषिकाचे मूल्य न पाहता उत्कृष्ट क्रीडापटू व्हा

पारितोषिकाचे मूल्य न पाहता उत्कृष्ट क्रीडापटू व्हा

Next
ठळक मुद्दे रामदास तडस यांचे आवाहन : प्लॉस्टिक बॉल क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : स्पर्धा ही मोठी असो की लहान, खेळाडूने खेळत राहिले पाहिजे. त्यातूनच आपण उत्कृष्ठ खेळाडू होऊ शकतो. एक मल्ल म्हणून आपण स्वत: मागील कित्येक वर्षापासून लाल मातीच्या मैदानात खेळलो. केवळ दहा रूपयाच्या पारितोषिकापासून तर हजारो रूपयाच्या पारितोषिकापर्यंत खेळत राहिले. देशाला आज चांगल्या खेळाडूंची गरज आहे. शासनही चांगले खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा खेळतांना पारितोषिकाचे मूल्य न पाहता जिद्द ठेऊन उत्कृष्ट क्रीडापटू बना, असा मौलिक सल्ला खासदार रामदास तडस यांनी दिला.
भाजपा स्पोर्टींग क्लब व शिव बाल गणेश मंडळ, नाचणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भस्तरीय खुले प्लास्टीक बॉल रात्रकालिन भव्य अटल चषक क्रिकेट सामन्याचे कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे तर जिल्हा प्रवक्ता राहुल चोपडा, जि.प. सदस्य प्रविण सावरकर, पं.स. सदस्य किशोर गव्हाळकर, भाजपा जिल्हा सचिव नितीन बडगे, नाचणगाव भाजपा अध्यक्ष अनिल राऊत, विनोद बिरे, राजीव बतरा, निलेश नागपूरकर, रोहण ठाकरे, राजेंद्र मोकळकर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. तडस म्हणाले, राज्यात चांगले खेळाडू तयार व्हावे यासाठी राज्य शासनाने प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. येथे खेळाडूंसाठी सर्वोतोपरी व्यवस्था आहे. भाजपा शासन उत्कृष्ठ खेळाडूंचा सन्मान करते. खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
क्रीडांगणासाठी किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या आरोग्यासाठी वॉकिंग ट्रॅकसाठी निधी उपलब्ध करता येईल. परंतु ज्यासाठी आपण निधी मागत आहोत ते मैदान आधी सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. राज्य व केंद्र शासनाकडून यासाठी निधी आणण्याचा आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
याप्रसंगी खा. रामदास तडस यांचा क्लब तर्फे शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी विदर्भातील अनेक क्रिकेट संघ दाखल झाले होते. कार्यक्रमाचे संचालन मंगेश रावेकर यांनी केले तर आभार आकाश दुबे यांनी मानले. सामने पाहण्याकरिता क्रिकेट प्रेमींची उपस्थिती होती.

Web Title: Become the best athlete without the prize value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.