काही राजकीय नेत्यांच्या षड्यंत्राचा बळी ठरलो

By admin | Published: March 12, 2016 02:19 AM2016-03-12T02:19:52+5:302016-03-12T02:19:52+5:30

काही राजकीय मंडळींनी आपल्याला राजकीय जीवनातून संपविण्याचे षडयंत्र रचले. यातूनच आपणासह पत्नी, साळा व साळभावावर गंभीर गुन्हे लावण्यात आले,

Become a victim of some political leaders' conspiracies | काही राजकीय नेत्यांच्या षड्यंत्राचा बळी ठरलो

काही राजकीय नेत्यांच्या षड्यंत्राचा बळी ठरलो

Next

मिलिंद भेंडेंचा गौप्यस्फोट : एका नेत्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आरोप
वर्धा : काही राजकीय मंडळींनी आपल्याला राजकीय जीवनातून संपविण्याचे षडयंत्र रचले. यातूनच आपणासह पत्नी, साळा व साळभावावर गंभीर गुन्हे लावण्यात आले, असा गौप्यस्फोट मिलिंद भेंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत केला. यात एका राजकीय नेत्याने महत्त्वाची भूमिका बजावली, असेही भेंडे म्हणाले. मात्र कुणाचीही नावे सांगण्यास भेंडे यांनी नकार दिल्याने प्रकरणाचे गुढ वाढले आहे. मग ही मंडळी कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे. या घडामोडींनी सदर प्रकरण नवे वळण घेण्याची शक्यता आहे.
ज्या महिलेले आपणाविरुद्ध गंभीर आरोप लावले ती ५ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली; परंतु तक्रार न करताच परत आली. यानंतर सायंकाळी ६ वाजता तिने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना भेटून पुन्हा तक्रार दिली. रात्री ७.३० वाजता सेवाग्राम पोलिसांनी आपल्यावर गुन्हा नोंद केला. हे सहज घडले नाही. दरम्यानच्या कालावधीत त्या महिलेशी तिच्या भ्रमणध्वनीवर तब्बल १८ जणांनी संपर्क साधला. यामध्ये १० राजकीय मंडळी होती. आठ इतर मंडळी होती. पैकी काही लोकांनी तिला समजाविण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी तिला तक्रार करण्यासाठी बाघ्य केले, असा गंभीर आरोपही भेंडे यांनी केला. ज्यांनी तिला तक्रार देण्यास बाघ्य केले त्यांची नावे लवकरच पुराव्यानिशी जनतेपुढे आणणार आहे, असेही भेंडे म्हणाले.

Web Title: Become a victim of some political leaders' conspiracies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.