उच्चपदस्थ होऊन भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:28+5:30
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सालोडच्या वतीने सदगुरू सदानंद मठ येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. परीक्षेमध्ये केवळ टक्केवारी मिळविण्यासाठी धडपडू नका. आपल्या आसपास जे चांगले आहे, ते घेण्याचा प्रयत्न केल्यास जीवनात यश मिळते. यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक समाजातील थोर पुरुष व यशस्वी मान्यवरांचे चरित्र अभ्यासले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सालोडच्या वतीने सदगुरू सदानंद मठ येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवानंद महाराज मठाधिपती, सालोड होते. माजी खासदार सुरेश वाघमारे, शेखर शेंडे, राजू तिमांडे, जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, सभापती सोनाली कलोडे, जि.प. सदस्य पंकज सायंकार, पडेगावचे सरपंच अनंता हटवार, नेरीचे सरपंच धनराज टुले, पं.स.सदस्य सुविता मुते, उपसरपंच अजय झाडे, उपसरपंच रवी राऊत, शरयू वांदिले, यशवंत वांदिले, गुलाब तडस, रूपराव सावरकर, वासुदेव जुडे, वंदना वांदिले, शालिनी वैतागे, जयश्री झाडे, अशोक कलोडे, निळकंठ पिसे, किशोर गुजरकर, नितीन साठोणे, सुधीर चाफले, चंदू चामटकर, जगन्नाथ लाकडे, देवा निखाडे उपस्थित होते.
खासदार रामदास तडस व अनेक वर्षांपासून गावातील समाजातील मुलांना नि:शुल्क शिक्षण देणारे प्रा. रमेश हागे, प्रा. धर्मेश झाडे यांचा सत्कार करण्यात आला. सालोड येथील ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सालोड येथील ग्रामस्थांनी केले.
यावेळी माधवानंद महाराज मठाधिपती, माजी खासदार सुरेश वाघमारे, शेखर शेंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले तर संचालन धर्मेश झाडे, संदीप रघाटाटे, अनुप झाडे यांनी केले. आभार रमेश आगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता कृष्णाजी मुते, हरीश तडस, ताराचंद सावरकर, विनोद महाकाळकर, विनोद फटिंग, दिगांबर खोडनकर, सुनील रघाटाटे, सुधीर वैतागे, नरेंद्र धानकुटे, शुभम ढोक, धीरज झाडे, बंडू सागरे, संजय लाडेकर, रवी ढोक, विवेक हजारे, राजू पेटकर, अवधूत सातपुते, अनुप झाडे, आशित वांदिले, बळवंत तेलरांधे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.