टोकनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:14+5:30

आर्वी बाजार समितीच्या अडत्यामार्फत शेतकऱ्यांना मालाचे टोकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी होऊ नये, त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी, बाजार समिती सभापतींच्या सूचनेनुसार शेतमाल खरेदी सुरू केली आहे. मार्केट यार्डमध्ये पाच ठिकाणी हात धुण्यासाठी सुविधा केली आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मालाची आवक घेतल्या जाईल.

Beginning to buy farmers' goods through tokens | टोकनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात

टोकनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात

Next
ठळक मुद्देआर्वी कृउबासकडून दिलासा । दररोज १ हजार क्विंटल शेतमालाची आवक

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून आर्वी येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात झाली असून दररोज ९०० ते एक हजार क्विंटल शेतमालाची आवक बाजार समितीत सुरू आहे. अडत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागणार आहे. शेतकºयांना बाजार समितीच्या अडत्यांकडे आपल्या मालाची नोंद करणे बंधनकारक असून नोंदणीनंतर टोकन संबंधीत शेतकऱ्यास देऊन त्यांचा माल खरेदी करणार आहे.
आर्वी बाजार समितीच्या अडत्यामार्फत शेतकऱ्यांना मालाचे टोकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी होऊ नये, त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी, बाजार समिती सभापतींच्या सूचनेनुसार शेतमाल खरेदी सुरू केली आहे. मार्केट यार्डमध्ये पाच ठिकाणी हात धुण्यासाठी सुविधा केली आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मालाची आवक घेतल्या जाईल. सकाळी ११ वाजता शेतमालाचा लिलाव करण्यात येतो व दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व माल भरून लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्या जाते. सध्या तूर ५४०० तर चण्याला ३८०० रुपये क्विंटल भाव शेतकºयांना देण्यात येत आहे. मार्केट यार्डवर आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गरीब व गरजूंना बाजार समितीच्यावतीने जेवण देण्यात येत आहे. शुक्रवारी बाजार समिती परिसरात विषाणू बाधीत औषधाची फवारणी करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आर्वी बाजार समितीचे सभापती महादेव भाकरे, दिलीप भुसारी यांच्यासह बाजार समितीचे सर्व कर्मचारी सहकार्य करीत आहे.

आठवड्यातून दोनदा होणार निर्जंतुकीकरण फवारणी
आर्वी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळाने आठवड्यातून दोन दिवस बाजार समिती परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्वी बाजार समितीत अडत्यामार्फत शेतकºयांना टोकन देऊन शेतमाल खरेदी करणे सुरू झाले आहे. दररोज ९०० ते १००० क्विंटल शेतमालाची आवक सुरू आहे. शेतकºयांनी अडत्यांशी संपर्क करून शेतमालाची नोंदणी करून घ्यावी.
विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृउबास, आर्वी

Web Title: Beginning to buy farmers' goods through tokens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी