प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:52 PM2018-08-28T23:52:36+5:302018-08-28T23:52:47+5:30

प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. आज सहाव्या दिवशी शिवसेनेच्या मध्यस्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांच्याहस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.

Behind the fasting of project affected people | प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे

प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : अशोक शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडविले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते.
आज सहाव्या दिवशी शिवसेनेच्या मध्यस्तीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांच्याहस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली.
प्रकल्पग्रस्तांना नोकरी सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.परंतू नोकरीच्या प्रतिक्षेत युवकांचे वय निघून गेल्याने ते अद्यापही बेरोजगार आहेत. त्यामुळे नोकरीची अट काढून २५ लाख रुपये देण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र, जमिनीचा सातबारा, जमिनीचे पट्टे देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणात देवेन्द्र हिवरकर, रवींद्र चाफले, आकाश निस्ताने, सुनिल शेंडे, वैभव ठाकरे या प्रकल्पग्रस्तांचा समावेश होता. दररोज उपोषणकर्त्यांची संख्या वाढतच होती. आज सहाव्या दिवशी उपोषकर्त्यांची संख्या १४ वर पोहचली होती. दरम्यान वैभव ठाकरे, सुनील शेंडे व आकाश निस्ताने या तीन उपोषकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपोषण सुरु असतांनाच झालेल्या पावसाची तमा न बाळगता आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी उपोषण सुरुच ठेवले. नुकताच पार पडलेला रक्षाबंधनाचा सणही या प्रकल्पग्रस्तांनी याच उपोषण मंडपात साजरा केला. या प्रकल्पग्रस्तांना अनेकांनी पाठींबा जाहीर करीत उपोषण मंडपाला भेटी दिल्या. तसेच इतरही प्रकल्पग्रस्तांनी या मंडपात येऊन आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान काँग्रेसचे शहरअध्यक्ष सुधीर पांगूळ, शेतकरी आरक्षणचे शैलेश अग्रवाल आणि शिवसेनेचे उपनेते उपनेते तथा माजी मंत्री अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्यासह शिवसैनिकांनी उपोषकर्त्यांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला. तसेच मागण्या मंजूर करुन घेईपर्यंत सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही यावेळी उपोषणकर्त्यांना दिले होते. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन करुन आजी-माजी शासनाने प्रकल्पग्रस्तांची पिळवणूक केली.भाजपच्या नेते ेमंडळींनी फक्त आमचं भांडवल करून मोठ्या प्रमाणात आमची मते लाटली असा आरोप करण्यात आला. तसेच यापुढे गैरफायदा घेणाºयांना संधी देणार नसल्याचा इशाराही या मंडपातून देण्यात आला.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढाव्या यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली व या आंदोलनांची, उपोषणांची सांगता करतांनी तत्कालीन विरोधी आणि आजचे सत्ताधारी देवेन्द्र फडणवीस आझाद मैदानवर बोलले होते की हे सरकार ऐकणार नाही. आपले सरकार आणा चुटकी सरशी समस्या निकाली काढू. याच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना व तटकरेंना २० स्मरणपत्रे देणारे आजचे वित्तमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याविषयी कानाडोळा करत असल्याचा आरोप यावेळी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष राजेश शिरगरे यांनी केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांबाबत विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांच्या कामात येणाºया प्रशासकीय अडचणी तात्काळ दूर करून स्वत: लक्ष घालून सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली. मागण्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सहाव्या दिवशी झाली उपोषणाची सांगता
प्रशासनिक व स्थानिक अडचणी दूर करून प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्र, ७/१२, भूखंड वाटप आदी प्रश्नांवर सहकार्य करणार असल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनावर प्रकल्पग्रस्तांनी विश्वास ठेवण्यास हरकत नसावी. धोरणात्मक विषय त्यांच्या अखत्यारीत नसून शासकीय इच्छाशक्तीचा भाग आहे. यावर तोडगा काढण्याचा अधिकार फक्त धोरण आखण्याची सक्षमता असणाºया शासनकर्त्यांकडे आहे. धोरण आखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती आवश्यक असते. शिवसेना कायम प्रकल्पग्रस्तांच्या सोबत असल्याचे मत शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे व्यक्त केले व आपण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न शासन दरबारी लावणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Web Title: Behind the fasting of project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.