रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:34 PM2018-02-19T22:34:08+5:302018-02-19T22:34:34+5:30

जय शिवाजी.. जय भवानी... जिजाऊंचा जयजयकार अन् ढोल ताशांचा निनाद.. सोबत फटाक्यांची आतषबाजी.. रस्त्यांनी मिरवणूका, सर्वत्र भगवे झेंडे व पताका. निमित्त होते रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (तारखेनुसार). सोमवारी दिवसभर वर्धेतील शिवभक्तांसह विविध संघटनांच्यावतीने रयतेच्या राजाला मानाचा मुजरा केला.

Believing the King of the Raita | रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात विविध कार्यक्रम : मिरवणूक अन् छत्रपतींचा जयजयकार

आॅनलाईन लोकमत
वर्धा : जय शिवाजी.. जय भवानी... जिजाऊंचा जयजयकार अन् ढोल ताशांचा निनाद.. सोबत फटाक्यांची आतषबाजी.. रस्त्यांनी मिरवणूका, सर्वत्र भगवे झेंडे व पताका. निमित्त होते रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (तारखेनुसार). सोमवारी दिवसभर वर्धेतील शिवभक्तांसह विविध संघटनांच्यावतीने रयतेच्या राजाला मानाचा मुजरा केला.
वर्धा शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सकाळपासून नागरिकांची गर्दी होती. शहरातील कानाकोपºयातून निघालेल्या मिरवणुका शिवाजी महाराज चौकात पोहोचल्या. येथे महाराजांना माल्यार्पण करून अभिवादन केले. शिवाजी चौकात येणाºयांना कुठलाही त्रास होणार नाही, याकरिता शिवजी चौक मित्र परिवाराच्यावतीने व्यवस्था केली होती. तर पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
तत्पूर्वी संघटनांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठा सेवा संघाच्यावतीने सकाळी ८ वाजता मिरवणूक काढली. मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजयंती आठवडा म्हणून विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी काढलेली ही मिरवणूक आर्वी नाका परिसरातून निघून ती शिवाजी चौक परिसरात पोहोचली. सेवाग्राम येथे शिवजयंती उत्सव समिती व संभाजी ब्रिगेडच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानादरम्यान भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या माता, पत्नींचा सत्कार करण्यात आला. तर क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने सकाळी दुचाकी मिरवणुक काढून राजांना अभिवादन केले. ही दुचाकी रॅली सावजी महाराज देवस्थानापासून निघून शिवाजी चौक परिसरात पोहोचली.
शहरात सायंकाळी युवा सोशल फोरम आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. यातील फिरता स्टेज आकर्षण ठरला.
हिंगणघाट येथे आधार फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्यावतीने डॉ. ए.एन. सातपुडके यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानाला चागंलीच गर्दी झाली होती. याव्यतिरिक्त सेलू येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुटीचा दिवस असतानाही विविध शैक्षणिक संघटनांच्यावतीने शाळा, महाविद्यालयात छत्रपतिंना अभिवादन करण्यात आले.
युवतींनी सादर केला पोवाडा
शिवाजी चौक परिसरात विविध संघटनांच्या मिरवणुका पोहोचल्यानंतर येथे गायत्री काकडे व तिच्या सहकारी मित्रांनी पोवडा सादर केला. या पोवाड्यातून शिवछत्रपतींची महिमा विशद केली. तर देवश्री जगताप हिने भाषण देवून शिवरायांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
पाच मिनिटात राजांचे रेखाचित्र
शिवाजी चौक परिसरात येथील कलावंत अक्षय मोरे याने अवघ्या पाच मिनिटात राजाचे रेखाचित्र काढले. येथे येणाºयांकरिता त्याचे चित्र आकर्षणाचे कारण ठरत होते.

Web Title: Believing the King of the Raita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.