लाभार्थ्यांना घरकूल अनुदानाची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:00 AM2018-01-11T00:00:47+5:302018-01-11T00:00:59+5:30
पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, अनुदानाची रक्कम देण्यास ग्रामपंचायतकडून हेतुपुरस्पर टाळाटाळ होत असल्याची तक्रार बिरीम फिरंता वर्मा यांनी आर्वी पं.स.चे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेड : पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, अनुदानाची रक्कम देण्यास ग्रामपंचायतकडून हेतुपुरस्पर टाळाटाळ होत असल्याची तक्रार बिरीम फिरंता वर्मा यांनी आर्वी पं.स.चे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. तात्काळ अनुदानाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
सदर लाभार्थीला घराचे बांधकाम करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत पंचवीस हजार रुपयांचा प्रथम चेक उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे वर्मा यांनी घराच्या बांधकामाला सुरूवात केली. घराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ही रक्कम अपूरी पडत असल्याने वर्मा यांनी काही निकटवर्तीयांकडून रक्कम उसणवारीवर घेतली. इतकेच नव्हे तर त्यांनी घराच्या बांधकामासाठी लागणारे काही साहित्य उधारही घेतले होते. उसनवारी पैसे व उधारीच्या साहित्यावर सध्या घराचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अद्यापही वर्मा यांना शासनाकडून घर बांधकामासाठी मिळणारी अनुदानाची रक्कम मिळालेली नसल्याने ती मिळावी या आशेने वर्मा यांनी ग्रामसेविका मेघा कोळी यांना माहिती देण्यात आली. परंतु, चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने अनुदानाची रक्कम देण्यात आलेली नाही. आर्वी पं. स. कार्यालयात विचारणा केली असता घर बांधकामाचे छायाचित्रच संबंधित बेबसाईडवर अपलोड झाले नसल्याचे सांगण्यात आले. ग्रा.पं. प्रशासनाकडून होत असलेली टाळाटाळ व होत असलेला त्रास लक्षात घेता तात्काळ घरकुलाचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.