खड्ड्यात लावली बेशरमची झाडे

By Admin | Published: September 8, 2016 12:48 AM2016-09-08T00:48:42+5:302016-09-08T00:48:42+5:30

शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होते आहेत.

Bescharam trees planted in pits | खड्ड्यात लावली बेशरमची झाडे

खड्ड्यात लावली बेशरमची झाडे

googlenewsNext

रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी : रायुकाँचे अभिनव आंदोलन, बांधकाम विभागाला निवेदन
वर्धा : शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होते आहेत. वर्धा-नागपूर, आर्वी-वर्धा हिंगणघाट-वर्धा व सावंगी मार्ग अशा महत्वाच्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या समस्येकडे जिल्हा बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खड्ड्यांत बेशरमची झाडे लावून अभिनव आंदोलन करण्यात आले. तसेच रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभिअयंता चौधरी आणि जि. प. बांधकाम विभागाला बुधवारी निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील बहुतेक मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असतानाही बांधकाम विभागाद्वारे केवळ मुरूम टाकून तात्पुरती डागडूजी करण्यात येत आहे. दोनच दिवसात खड्डं्यामधील मुरूम निघून रस्ता पुन्हा जैसे थेच होतो. त्यामुळे सदर रस्ते कायमस्वरूपी बांधण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. बांधकाम विभागाला खड्डं्याचे गांभीर्य कळावे यासाठी दत्तपूर बायपास जवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यांत रायुकार् कार्यकर्त्यांनी बेशरमची झाडे लावून निषेधही व्यक्त केला.
स्मार्ट सिटी, स्मार्ट रस्ते अशा घोषणा शासनाद्वारे केल्या जात आहेत. प्रत्यक्षात रस्त्यांची काय अवस्था आहे हे पाहणे आधी गरजेचे आहे. जिल्ह्यात दररोज अपघात होत आहेत. खड्डेमय रस्ते हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. बांधकाम विभागाने गंभीरपणे याकडे लक्ष देण्याची गरज निवेदनातून व्यक्त करण्यात आली. गरजेचे आहे.
आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे, वैभव चन्ने, अर्चित निघडे, राहुल घोडे, तुषार भुते, आशु बढे, योगेश पवार, सचिन रायपुरे, हेमंत कडू, सुयोग बिरे, आकाश चौधरी, विक्की खडसे, अक्षय गावंडे, संकेत निस्ताने, अमीत तिवारी, अभिषेक वडतकर, अमीत लुंगे, निलेश जांभुळकर, प्रणय कदम, प्रणव सडमाके, वैभव चौधरी, मंगेश गावंडे, वैभव गांजे यांच्यासह इतरही कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Bescharam trees planted in pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.