डेंग्यू टाळण्यासाठी दक्षता हाच उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:35 PM2018-05-17T21:35:08+5:302018-05-17T21:35:08+5:30
किटकजन्य आजारात डेंग्यू ाध्या आघाडीवर आहे. यावर उपाययोजना नाही असे नाही. पण त्यापासून बचावाकरिता दक्षता हा उत्तम पर्याय आहे, असे विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडवी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : किटकजन्य आजारात डेंग्यू ाध्या आघाडीवर आहे. यावर उपाययोजना नाही असे नाही. पण त्यापासून बचावाकरिता दक्षता हा उत्तम पर्याय आहे, असे विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडवी यांनी व्यक्त केले.
देशात १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशिक्षण पथकाच्यावतने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षण पथकाचे डॉ. मंगेश रेवतकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले. जिल्ह्यातील डेंग्यू विषयक स्थिती नियंत्रण, रक्तजल नमुने व परिसर स्वच्छता अभियानामुळे डेंग्यु आजार कसा नियंत्रित राहील याबाबत माहिती दिली. डॉ. गहलोत यांनी डेंग्यू या आजाराबाबत मार्गदर्शन करताना डासांच्या सवयी उत्पत्ती स्थाने शहरीकरण डेंग्यू आजाराचे प्रकार डी-१, डी-२, डीएचएफ, डीएच.एस व लक्षणे, पाणी साठे तसेच डासांची अंडी वर्षभर कशी जिवंत राहतात व त्यातून डास निर्माण होवून डेंग्यू आजार कसा पसरतो याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाला नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशिक्षण पथक, हत्तीरोग विभाग, हिवताप विभाग येथील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता पाटील, टागोर, काळसर्पे, बोटफोले, राऊत, गोदारी, नंदनवार, ढगे, कुमरे, पंडीत, जाधव, चौधरी, भेंडे, मानकर, गंधे, हर्डे आदींनी सहकार्य केले. संचालन अरविंद लोखंडे यांनी केले.