शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची दहशत कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:47 PM2018-08-23T21:47:42+5:302018-08-23T21:48:33+5:30

बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी समुद्रपूर तालुक्यातील कोरा भागातील शेतशिवाराचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Betrayal of the farmers is always in the midst of farmers | शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची दहशत कायमच

शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची दहशत कायमच

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी केला कोरा शिवाराचा दौरा : शेतकºयांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरा : बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी समुद्रपूर तालुक्यातील कोरा भागातील शेतशिवाराचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
कामगंध सापळ्यांचा वापर करा, त्याचप्रमाणे कृषी विभागामार्फत ज्या ज्या सूचना देण्यात येत आहे, त्याचे पालन करा. बोंडअळीचा आपण सामना करू शकतो असे जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतकऱ्यांना सांगितले. एका शेतकऱ्याने याप्रसंगी म्हटले की, बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे हाल होत असून औषधी निर्माते व विक्रेते मालामाल होत आहे. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले की, कोणी कोणतीही कीटकनाशके वापरली म्हणून आपण ही ती वापरावी असे करू नका तर आपल्या पिकाला कशाची आवश्यकता आहे, याचा विचार करून कीटकनाशकांचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले. नारायणपूर येथील युवराज सालवरकर या शेतकºयांचे ५ एकरातील सोयाबीन शेत अळीने नष्ट केले. महागडे कीटकनाशक वापरण्याची गरज नाही तर किनालफॉस, प्रोफीनोफॉन या औषधाने या अळ्यांवर नियंत्रण मिळविता येते. त्याचप्रमाणे सोयाबीनवर असलेली बुरशी, आलेली अळी गोळा करून त्यात थोडा गुळ मिसळून पाण्यामध्ये मिश्रण करून फवारणी करावी. अळीवर आळा बसविता येते अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी यावेळी शेतकºयांना दिली. कोरा येथे शुक्रवारला कपाशी व सोयाबीन पीकावर कृषी मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.यावेळी बजरंग अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल, डॉ. विद्या मानकर, नायब तहसीलदार मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, मेश्राम, बजरंग अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजचे खरशे, कृषी पर्यवेक्षक धोटे, जि.प. सदस्य रोशन चौखे, पं.स. सदस्य वसंता घुमडे, कोराचे सरपंच अरूण चौधरी आदीशी संवाद साधला.
बोंडअळी प्रादुर्भावाला ‘राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती’ घोषित करा
वर्धा- कपाशीच्या पिकावर आलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदील झाला आहे. आलेल्या संकटाला ‘राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती’ घोषीत करा, अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली आहे. शासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाच्या पिकावर बोंडे लागल्यानंतर बोंडअळीच्या प्रादुर्भाव झाला होता. परंतु यावर्षी खरीपाच्या हंगामात कपाशीचे झाडे पाती, फुलावर, बोंडावर आल्या पासूनच बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या झाडावर सुरुवातीच्या पाती, फुलापासूनच बोंड अळी सुरू झाली आहे. मान्सून पूर्व पेरणी, धुळ-पेरणी, पाणी पडल्यानंतर केलेली पेरणी अशाप्रकारे वेगवेगळ्या पध्दतीने केलेल्या कपाशीच्या डोबणे बोंड अळीग्रस्त झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक १०० टक्के शेतकरी असमानी संकटात सापडला आहे. शेतकºयांनी उपाय योजना करून सुध्दा बोंड अळीवर नियंत्रण मिळवता आले नाही. केंद्र व राज्य सरकारने बोंड अळीची व्याप्ती लक्षात घेता, तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान पातळीचा विचार करून या संकटाला राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत करावे.

Web Title: Betrayal of the farmers is always in the midst of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.