भिडी, आंजी, पवनारात निघाला निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:00 AM2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:01:10+5:30
एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नजीकच्या भिडी येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शिवाय नागरिकांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नजीकच्या भिडी येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शिवाय नागरिकांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आली.
भिडी येथील व्यापाऱ्यांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेऊन घटनेचा निषेध नोंदविला. शिवाय आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. जनआक्रोश मोर्चात व्यापारी संघटना, यशवंत माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, जि. प. शाळा, सत्य साई सेवा समिती, अल्कहोलीक अॅन्यानिमस, मेहरबाबा केंद्र, रमाई व भीमाईचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाने गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. मोर्चाचा समारोप यशवंत शाळेच्या प्रांगणात झाला. यावेळी देवळीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. मोर्चात सरपंच सचिन बीरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीधर लाभे, डॉ. प्रकाश काळे, सुनील चोरे, प्रा. चेतना डफळे, अॅड. अस्मिता भगत, निशा कापकर, सुजाता भगत, शिल्पा राऊत, निर्मला गुल्हाणे, मुख्याध्यापिका आटे, ग्रा.पं. सदस्य राजू खडसे, धनराज वाघाडे, मनोज बोबडे, प्रशांत साठे, विजय देवतळे, प्रा. अरविंद राठोड, प्रा. शिरीष वानकर, प्रा. प्रफुल्ल, अजय झाडे, प्रफुल कांबळे, राजू वटाणे, नरेश जगनाडे, संजय तºहेकर, नितीन वानखेडे, सुशील राऊत, सुरेश अलोडे, गजानन काने, जयंत पाटील, अजय वानखेडे यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मांडगावात ग्रामस्थांसह विद्यार्थिनी रस्त्यावर
मांडगाव : मांडगावतील नागरिक विद्यार्थी महिला तसेच सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींनी गावातून निषेध मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. या मोर्चात सुमारे तीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांचे पुढारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाने गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. यशवंत महाविद्यालय, विकास विद्यालय, मोतीराम शिंदे आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेज, बºहाणपुरे महाराज कृषी तंत्र महाविद्यालय, गुरुकुल कॉन्व्हेट, कस्तुरबा नर्सिंग स्कूल, प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच हेमंत पाहुणे, रवींद्र जोहरी, सुनील डुकरे, स्वप्नील पाहुणे, विकी घुसे, योगेश पाहुणे, यशवंत पाहुणे,प्रशांत खडगी,अरुण तडस, दुबे, हुलके,चोके आदी सहभागी झाले होते.
हिंगणीत मूकमोर्चातून व्यक्त केला निषेध
हिंगणी : येथे स्थानिक नागरिकांनी मुकमोर्चा काढून हिंगणघाट येथील घटनेचा निषेध नोंदविला. हिंगणी येथील यशवंत विद्यालय येथून काढण्यात आलेल्या मोर्चाने गावातील मार्गाने मार्गक्रमण केले. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचताच विविध मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी सायरे यांच्या मार्फत तहसीलदारांना सादर करण्यात आले. हिंगणी गावात काढण्यात आलेल्या मोर्चात पंचायत समिती सभापती अशोक मुडे, पोलीस पाटील मारोती चचाने, माजी उपसरपंच अनिल बोकडे, सेवानिवृत्त शिक्षक अजित शेख, आशिष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शुभम सराफ, सनी रॉय, विनोद येवले, धर्मेश मुडे, रजत रणवरे, प्रभाकर बावणे, मंगेश काळे, विकी जाधव यांच्यासह यशवंत विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पुढारी आणि गावातील महिला-तरुणी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी रेटण्यात आली.
आंजी (मोठी) येथे घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ राहिली बंद
आंजी (मोठी) : हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बाजार पेठ बंद ठेवून निषेध मोर्चा गावातून काढण्यात आला. आदर्श विद्यालय येथून काढण्यात आलेल्या मोर्चाने गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मार्च मध्ये जि. प. सदस्य जयश्री गफाट, सरपंच जगदीश संचेरीया तसेच ग्रा. पं. सदस्य, आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, श्री कला महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, सरस्वती विद्या मंदिर, गुड शेफर्ड इग्लिश हास्कूलच्या विद्यार्थी, शिक्षक तसेच महीला बचत गटाच्या सदस्या, कस्तुरबा हेल्थचे कर्मचारी, जि.प. आंतरराष्ट्रीय शाळाचे कर्मचारी, प्रेरणा फाऊंडेशन, सार्वजनिक अभ्यासिका केंद्र, मानवता बहुउद्देशीय संस्था, संविधान दिन उत्सव समिती, विविध कार्यकारी संस्था, प्राथमिक केंद्रचे कर्मचारी, विविध संस्थाचे प्रतिनिधीनी सहभागी झाले होते. मोर्चाच्या समारोपादरम्यान खंरागणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड यांना आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पवनारात जनआक्रोश
पवनार : हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निषेधार्थ पवनार येथे चैतन्य स्पोर्टींग क्लबच्यावतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, सामाजिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रा.पं. कार्यालयाच्या आवारातून काढण्यात आलेल्या मोर्चाने गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. तर आंदोलनकर्त्यांनी सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे यांना निवेदन सादर केले. यावेळी सरपंच शालिनी आदमने, रविंद्र बोकडे, दीपक उमाटे, अजय गांडोळे, वैद्य, रुकेश बावणे, चोंदे, विशाल नगराळे आदींची उपस्थिती होती.
सेलडोह येथे रॅलीतून घटनेचा निषेध
केळझर : हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ ग्रा.पं. सेलडोह येथे यशवंत हायस्कूल, इंदिरा हायस्कूल, सर्व विद्यार्थी व प्राथमिक शाळा या तिन्ही शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच महिला बचत गट, गावातील महिलांनी एकत्र येत गावातून निषेध रॅली काढली होती. निषेध रॅली जि.प. शाळा सेलडोह येथून शास्त्री चौक मार्गे, बिरसामुंडा चौक, हनुमान मंदिर, इंदिरा हायस्कूलकडे रवाना झाली. रॅलीचे नेतृत्त्व जयपूरकर यांनी केले. यावेळी सिंदी पोलीस स्टेशन प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी सेलडोह सरपंच रिना तिवारी, पं.स. सदस्य जयश्री खोडे, उपसरपंच मोरेश्वर मडावी तसेच सर्व ग्रा.पं. सदस्य, गांधी तंटामुक्ती उपाध्यक्ष ताराचंद सोनटक्के, विजू खोडे, भारत बेलोणे, केशव खोडे, रमेश सावरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.