पालकमंत्री येण्यापूर्वीच केले रस्त्याचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:00 AM2020-12-26T05:00:00+5:302020-12-26T05:00:12+5:30
आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी हा रस्त्या नव्याने करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली असता या रस्त्यासाठी ६०.३६ कोटी रूपयांचा निधी दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/आर्वी : आर्वी-देऊरवाडा या रस्त्याचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार २८ डिसेंबर रोजी करणार असले तरी याच रस्त्याचे काम अतिशय वेगाने सुरू करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात या रस्त्याच्या विकासासाठी निधी मिळाला असल्याने पालकमंत्र्यांच्या पुर्वीच खासदार रामदास तडस यांच्या हस्ते आणि आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमावरही आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी हा रस्त्या नव्याने करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली असता या रस्त्यासाठी ६०.३६ कोटी रूपयांचा निधी दिला होता.
शासकीय निधी खेचून आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनीही सहकार्य केले होते. या रस्त्या लगत सुमारे दहा गावे असून त्या गावातील नागरिकांना या रस्त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या रस्त्याच्या कडेला असलेली विद्युत खांब स्थलांतरित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. देऊरवाडा ते नांदपुरपर्यंत खाेदकामही करण्यात आले आहे. लवकरच हा रस्ता गुळगुळीत होणार आहे.