शक्तिशाली भारत निर्मितीकरिता सायकल यात्रा
By admin | Published: June 27, 2017 01:20 AM2017-06-27T01:20:28+5:302017-06-27T01:20:28+5:30
भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना अपेक्षीत शक्तिशाली भारत निर्मितीकरिता विष्णूदेवा बहुउद्देशीय संस्थेद्वारे अकोला ते दिल्ली अशी सायकल यात्रा काढण्यात आली आहे.
अकोला ते दिल्ली प्रवास : राष्ट्रपती व पंतप्रधानांना देणार निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना अपेक्षीत शक्तिशाली भारत निर्मितीकरिता विष्णूदेवा बहुउद्देशीय संस्थेद्वारे अकोला ते दिल्ली अशी सायकल यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सोमवारी तळेगाव येथे पोहचल्यावर यात्रेकरुंचा सत्कार करण्यात आला.
शरीर तंदुरुस्त, पर्यावरण संवर्धन, इंधन व पैशाची बचत करणारे वाहन ‘सायकल’ हे राष्ट्रीय वाहन व्हावे या हेतूने अकोला ते दिल्लीपर्यंत दहा सदस्यीय चमू सायकलने प्रवास करणार आहे. शक्तिशाली भारत निर्मितीकरिता ही बाब महत्त्वपूर्ण असून राष्ट्रनिर्माण, निसर्ग संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, सामाजिक, शारीरिक आरोग्य याबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देण्यात येणार आहे. विष्णूदेवा बहुउद्देशीय संस्थेद्वारे गजानन खेडकर यांच्या नेतृत्वात निघालेली यात्रा दिवसाला ५० किमीचा प्रवास करते. या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेत नैनसुख लढ्ढा, गोपी गुप्ता, विवेक केचे, राजकुमार बैस, प्रेम जयस्वाल, विशाल गाडगे, ईश्वर सहारे, आशिष गावंडे, मनोज मोकलकर, नानकसिंग बावरी, सचिन गावंडे आदींनी सत्कार केला.