भरधाव बसची दुचाकीला धडक; युवक ठार
By admin | Published: October 29, 2015 02:19 AM2015-10-29T02:19:54+5:302015-10-29T02:19:54+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला.
वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास सेवाग्राम येथील हनुमान मंदिराजवळ घडला. जावेद सलीम पठाण (२०) असे मृत युवकाचे नाव आहे.
जावेद हा बुधवारी सकाळी ७ वाजता दुचाकी एम.एच. ३२ एस. ३११५ ने कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे आपल्या आईला सोडून परत घरी जात होता. दरम्यान, सेवाग्राम येथील हनुमान मंदिराजवळ वर्धा ते हमदापूर बस एम.एच. ४०/८६१८ ने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात जावेदचा जागीच मृत्यू झाला. सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस चालक बाबाराव जनकुटे याला अटक केली. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता.(कार्यालय प्रतिनिधी)