पुस्तक आपल्या दारी अभियानाचे बिजारोपण

By Admin | Published: September 8, 2016 12:46 AM2016-09-08T00:46:23+5:302016-09-08T00:46:23+5:30

गावागावात वाचन संस्कृती रुजावी, याकरिता चालते-फिरते वाचनालय असलेले पुस्तक आपल्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Bijarapani Your Book | पुस्तक आपल्या दारी अभियानाचे बिजारोपण

पुस्तक आपल्या दारी अभियानाचे बिजारोपण

googlenewsNext

देवळी : गावागावात वाचन संस्कृती रुजावी, याकरिता चालते-फिरते वाचनालय असलेले पुस्तक आपल्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बोपापूर (दिघी) येथे माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवराव डबले होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वातंत्र्य सैनिक नामदेव राऊत, देवळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत मदने, उपनिरीक्षक गजानन दराडे उपस्थित होते.
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी या गावातून उपक्रमाचे बिजारोपण करण्यात आले. या माध्यमातून उद्याचे शासकीय अधिकारी व विचारवंत निर्माण होतील. जिल्हा पातळीवर या अभियानाला चालना मिळावी, असा सूर यावेळी भाषणातून व्यक्त झाला. या वाचनालयासाठी किशोर रोकडे, रमेश मुंजे, सुधाकर भोयर, प्रमोद राऊत, कैलास आघाव, विनोद दांदडे, गजानन लाटकर आदींनी पुस्तक भेट देवून उपक्रमाला चालना दिली. याप्रसंगी दहावी व बारावीतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गावकऱ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी समितीचे गठन केले. यात चंदू बावणे, नरेंद्र वांगे, करिश्मा राऊत, अमर केराम, स्वाती पचारे, वैभव भोकरे, सौरभ झामरे, प्रियंका भलावी, आचल पाटील, चेतन अडेकार, श्वेता वांगे यांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Bijarapani Your Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.