सावंगी टी पॉर्इंटवरील दुभाजकाची हालत खस्ता
By admin | Published: June 29, 2016 02:10 AM2016-06-29T02:10:07+5:302016-06-29T02:10:07+5:30
सावंगी (मेघे) टी पार्इंटवर असलेला दुभाजक रस्त्याला समांतर झाल्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
प्रहार संघटनेने वेधले लक्ष : आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा : सावंगी (मेघे) टी पार्इंटवर असलेला दुभाजक रस्त्याला समांतर झाल्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्याकरिता मंगळवारी सकाळी प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात येथे एखादी मोठी घटना घडल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहिल, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
सदर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा आहे. जवळच रुग्णालय असल्याने येथून २४ तास वर्दळ सुरू असते. त्यामुळे दुभाजकांची उंची व रेडियमचे काम सात दिवसाच्या आत करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती; परंतु यावर कोणतीच दखल घेतली नसल्याने येथे प्रहार पक्ष महाराष्ट्रतर्फे वर्धा शहर प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात आल्याचे म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा देण्यात आलेल्या निवेदनात या दुभाजक १५ दिवसाच्या आत उंच करण्यात यावा व त्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, याकडे दुर्लक्ष झाल्यास प्रहार व महाराष्ट्र वर्धा शहर तर्फे या ठिकाणी मोठे आंदोलन करेल, असा इशारा दिला. दुसरे आंदोलन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या निर्देशनानुसार करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख गजू कुबडे, वर्धा शहर प्रमुख विकास दांडगे, सागर हिवरे, श्याम शेलार, रोशन दाभाडे, वैभव चातुरकर, नावेद बेग, आकाश दांडगे, मयुर धाबर्डे, अक्षय झोटींग, आदित्य कोकडवार, दिनेश राजपुरोहित, आफताब अंसारी, शाहरूख ताजी, शुभम वानखेडे, निखील देशपांडे, मिनल डुकरे, कमलेश पिंपळकर, स्मितल भिवगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)