वर्ध्यात 'लक्ष्मी'ने दिला तिळ्यांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 02:59 PM2020-04-18T14:59:54+5:302020-04-18T15:03:08+5:30

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच लॉकडाऊनच्या काळात आज खरांगणा (मो.) नजीकच्या तामसवाडा येथे चंदू काळे यांच्या मालकीच्या 'लक्ष्मी' नामक संकरीत गाईने तिळ्यांना जन्म दिला.

Birth of Lakshmi cow gave birth to three cubs in Wardha | वर्ध्यात 'लक्ष्मी'ने दिला तिळ्यांना जन्म

वर्ध्यात 'लक्ष्मी'ने दिला तिळ्यांना जन्म

Next
ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यातील दुसरी घटनातामसवाडा परिसरात आनंदाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच लॉकडाऊनच्या काळात आज खरांगणा (मो.) नजीकच्या तामसवाडा येथे चंदू काळे यांच्या मालकीच्या 'लक्ष्मी' नामक संकरीत गाईने तिळ्यांना जन्म दिला. गाईने तिळ्यांना जन्म दिल्याची ही घटना वर्धा जिल्ह्यातील दुसरी असून त्याची नोंद पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. जन्मलेल्या दोन गोºहे तर एका कालवडीचा समावेश आहे. सदर घटनेमुळे तामसवाडा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

गाईने तिळ्यांना जन्म देण्याची घटना क्वचित घडते. यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात अशी घटना घडली होती. तर आता तामसवाडा येथे घटना घडली आहे. तामसवाडा येथील ही घटना वर्धा जिल्ह्यातील दुसरी आहे.
- डॉ. बी.व्ही. वंजारी, पशुसंवर्धन विभाग, जि.प. वर्धा

Web Title: Birth of Lakshmi cow gave birth to three cubs in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय