भाजप सरकार मागासवर्गीयांच्या विरूद्धच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:17 PM2017-11-11T22:17:48+5:302017-11-11T22:18:32+5:30

केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार पूर्णपणे बहुजन समाज म्हणजेच दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, मुस्लीम यांच्या विरोधातील आहे, ....

BJP government against backward class people | भाजप सरकार मागासवर्गीयांच्या विरूद्धच

भाजप सरकार मागासवर्गीयांच्या विरूद्धच

Next
ठळक मुद्देविलास गरूड : बसपाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार पूर्णपणे बहुजन समाज म्हणजेच दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, मुस्लीम यांच्या विरोधातील आहे, हे सांगतानाच बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी केंद्र व राज्यातील भाजपाशासित सरकारवर टीका केली.
चेतना अध्यापक विद्यालयात बसपाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, भाजपाने बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावतींना राज्यसभेत बोलू दिले नाही. राज्यसभेत बोलण्यापासून भाजप रोखू शकते; पण बहुजन समाजासमोर रोखण्याची त्यांची ताकद नाही. या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मायावती १० डिसेंबरला नागपूर येथे येत आहेत. भाजपाविरूद्ध संघर्षाच्या तयारीसाठी कराव्या लागणाºया कार्याची माहिती करून घेण्यासाठी जनतेने कस्तुरचंद पार्क नागपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन गरुड यांनी केले. यावेळी कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, हेमलता शंभरकर, अ‍ॅड. सुनील डोंगरे, मोहन राईकवार आदी उपस्थित होते. मेळाव्याला मोठ्या संख्येने बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.
चेतना जागृतीच्या माध्यमातून भाजपाला धडा
नोटबंदी व वस्तुसेवा कर यासारखे निर्णय घेऊन केंद्रातील भाजपा सरकारने सामान्यांना वेठीस धरले. या निर्णयांचा सामान्य नागरिकांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. बसपाद्वारे १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या काळात चेतना जागृती दिंंडीच्या माध्यमातून गावोगावी दोन्ही निर्णय कसे चुकीचे आहे, हे नागरिकांना पटवून दिले जाणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून भाजपाला धडा शिकविला जाणार असल्याची माहिती बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पूढे म्हणाले की, १० डिसेंबरला नागपूर येथे बसपाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता महासंमेलन आहे. यात जिल्ह्यातील सुमारे २५ हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत आहे. जिल्ह्यात १२०० बुथ असून प्रत्येकी २० कार्यकर्ते सहभागी होतील. पूर्वतयारी म्हणून चेतना अध्यापक विद्यालयात बैठक घेण्यात आली.

Web Title: BJP government against backward class people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.