आठ जागी भाजप तर सहा ग्रा.पं.वर कॉँग्रेसचा कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:05 PM2018-09-27T22:05:17+5:302018-09-27T22:05:47+5:30
१४ ग्रामपंचायतीचे निकाल लागले असून मतदारांनी भाजपच्या पारड्यात सर्वाधिक मत टाकत आठ ग्रा.पं. वर विजय मिळवून दिला. कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. पंचायत समिती सभापतीच्या लहान आर्वी गावातील भाजपचा उमेदवार पराभूत झाल्याने उलटसुलट चर्चा होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : १४ ग्रामपंचायतीचे निकाल लागले असून मतदारांनी भाजपच्या पारड्यात सर्वाधिक मत टाकत आठ ग्रा.पं. वर विजय मिळवून दिला. कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. पंचायत समिती सभापतीच्या लहान आर्वी गावातील भाजपचा उमेदवार पराभूत झाल्याने उलटसुलट चर्चा होती. साहुर येथेही पंचायत समिती सदस्याची पत्नी सरपंचपदासाठी उभी होती. त्यांनाही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
सकाळी १० वाजता तहसीलमध्ये मतमोजणीलाल सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची बसण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे तहसील प्रशासनाची अरेरावी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
लहान आर्वी ग्रामपंचायतमध्ये कॉँग्रेसचे सरपंच सोनू काकडे विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या सारीका मडावी यांचा ७७ मतांनी पराभव केला. एकूण ३ वॉर्डात ९ उमेदवार निवडून आले. वॉर्ड क्र. १ मधून विलास बोंदरकर, प्रभुदास सरदार, मनिषा गायकी, वॉर्ड क्र. २ मधून दादाराव देशमुख, शोभा उईके, रेखा आकोलकर, वॉर्ड क्र. ३ मधून विशाल चरडे, सुरेश वरूडकर, रंजिता होले यांचा विजय झाला.
साहूर ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदी भाजपच्या भावना राजेश खरडे यांचा विजय झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या शिला ईश्वर वरकड यांचा पराभव केला. चार वॉर्डातून एकूण ११ उमेदवार निवडून आले. यामध्ये भाजपचे १० तर कॉँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय झाला. वॉर्ड क्रमांक १ मधून सुरेश ठाकरे, नंदा कांदे, मनिषा गोलप, वॉर्ड क्रमांक २ मधून चेतन भोरे, प्रणाली वरकड विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक ३ मधून प्रशांत काकपुरे, अशोक झोडे, रंजना आमझिरे, वॉर्ड क्रमांक ४ मधून गोपाल गावंडे, कल्पना गायकवाड, ममता लोणारे यांचा विजय झाला. गेल्या २२ वर्षांपासून भाजपचे नेते रमेश वरकड यांच्या गटाचे येथे जोरदार वर्चस्व आहे. यावेळी वरकड रुग्णालयात ब्रेन हॅमरीजच्या आजाराने भरती होते. मात्र मतदारांनी त्यांच्यावर मतांची भरपूर कृपा केली.
वडाळा ग्रामपंचायतमध्ये कॉँग्रेसच्या अर्चना संदीप पोटे विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या अलका प्रवीण वाघमारे यांचा पराभव केला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून वर्षा परतेती, पद्मा धुके, बबन कोहळे, ज्योती कुरवाडे, भास्कर तंबाखे, छाया धुर्वे, वंदना काळे यांचा विजय झाला.
वर्धपूर ग्रा.पं. मध्ये कॉँग्रेसच्या संगिता गिरधर निंभोरकर सरपंचपदी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या योगिता प्रफुल धुके यांना पराभूत केले. ग्रा.पं. सदस्यांमध्ये हिंमत गाढवे, स्नेहा मोहत्रे, विशाल मोहत्रे, पुष्पा ब्राम्हणे, रविंद्र ठाकरे, वर्षा डांगे, अल्का पचारे निवडून आले.
माणिकनगर ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ता राजेश ठाकरे यांच्या गटाला मिळाली. येथे सरपंचपदी भाजपाच्या सिमा बरडे विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या रमा ठाकरे यांचा पराभव केला. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये दिलीप सनेसर, शेवंता कुरवाडे, सतीश पारिसे, चंदा कोहळे, देविदास पाथरे, कमला कुरवाडे, शांता पारिसे विजयी झाल्या.
ममदापूर ग्रामपंचायत दुसऱ्यांदा कॉँग्रेसच्या ताब्यात आली. येथे कॉँग्रेसच्या अनिता राजू गंजीवाले विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या सचिन ठाकरे यांचा पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये पंकज धुर्वे, वनिता तुमडाम, सुधीर उईके, अर्चना वैराळे या दोन वॉर्डातून निवडून आल्या. सीमा राऊत, शालीनी खरे यांचा विजय झाला.
रामदरा ग्रामपंचायतमध्ये कॉँग्रेस व शिवसेना युतीचे ओंकार धुर्वे विजयी झाले. त्यांनी भाजपाचे बापूराव सलाम यांचा पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये वामन पिंगळे, नुतन खरबडे, सुमित भुजाडे, जयश्री विंचुरकर, शोभा धोटे, शकुंतला कुरवाडे, प्रफुल डहाके विजयी झाले.
काकडदरा ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे दिनेश कोंडुलकर विजयी झाले. त्यांनी कॉँग्रेसचे मोहन गोहत्रे यांचा पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये विलास कोहळे, मंगला खरे, शरद टरके, सुनीता कदम, रितेश मनोहरे, वत्सला तुमडाम, मिरा वाघ यांचा विजय झाला.
सावंगा (पुनर्वसन) मध्ये भाजपच्या संगीता रामकृष्ण लवणकर विजयी झाल्या. त्यांनी सरपंचपदाच्या उमेदवार वर्षा कैलास नांदणे यांचा पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये रमेश भिसे, ललीता लंगोटे, अनिल नागले, नानुबाई कुकडे, हरिचंद्र सहारे, रत्ना माहोरे, सुर्यकांता परदेशी सदस्य म्हणून विजयी झाल्या.
जोहवाडी येथे सरपंच पदासाठी भाजपच्या सुरेखा उमेश नागोसे विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या विभा जाणे यांचा पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये साहेबराव जाणे, संगीता जहकर, चंदु जाणे, सुशिला जाणे, विनायक तायवाडे, मिना टेकाम, संजीवनी जाणे यांचा विजय झाला.
पिलापूर येथे सरपंचपदी भाजपाच्या वर्षा महादेव सायरे विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या वनीता प्रल्हाद धुर्वे यांचा पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये श्रीकृष्ण बारकवरे, आशा धुर्वे, राजेंद्र परणकर, लता मनोटे, संजय भोरे, सुनिता अंबडारे, माधुरी टेकाम विजयी झाल्या.
जैसापूर येथे कॉँग्रेसचे जनार्दन खंडारे सरपंचपदी विजयी झाले. त्यांनी भाजपचे मोतीराम बुलाखे यांचा पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये सुनील धुर्वे, भाग्यश्री परतेती, मधुकर चरडे, दिलीप धुर्वे, सुधा खंडाते, सुलोचना यसनसुरे विजयी झाल्या.
सुजातपूर ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी भाजपचे प्रवीण ठाकरे विजयी झाले. त्यांनी कॉँग्रेसचे मंगेश कोहळे यांचा दारूण पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये किशोर घोंगे, शितल ठाकरे, अजाब आत्राम, सुनिता परतेती, अंकुश इरपाचे, कल्पना डोंगरे विजयी झाल्या. नवीन आष्टी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी भाजपच्या अपर्णा सुरेश देशमुख मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या उमेदवार ललीता अनिल मानकर यांचा दारूण पराभव केला. ग्रा.पं. सदस्यांमध्ये मनोज मोकदम, ललीता परतेती, किशोरी कुकडे, प्रविण जंगम, सुरेखा मोपाळ, क्रांतीकुमार चिंचमलातपुरे, भारती बांडे यांचा विजय झाला. अनेक ठिकाणी नव्या लोकांना संधी मिळाली भाजपने आष्टी तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखले आहे.
तहसील कार्यालयात अरेरावी
आज मतदानाचे निकाल लागण्यापूर्वी सर्व पत्रकार मंडळी तहसीलदार आशीष वानखडे यांना भेटून आतमध्ये माहिती घेण्यासाठी प्रवेश देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी प्रवेश नाकारत सायंकाळी ५ वाजतापर्यंत आतमध्ये येवू नका अशी अरेरावी करीत येण्यास मज्जाव केला. लाऊडस्पीकरवर निकालाची घोषणा केली नाही. त्यामुळे बाहेर उभे असलेले उमेदवार व कार्यकर्ते यांच्यात प्रचंड नाराजी झाली. सायंकाळी ५ वाजता तहसीलदारांनी माहिती दिली नाही. त्यामुळे पत्रकारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. कर्मचाºयांनाही दिवसभर उपाशी ठेवण्यात आले.