२०१४ पेक्षाही भाजपाची सद्यस्थिती भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:26 PM2018-10-29T22:26:19+5:302018-10-29T22:27:08+5:30

काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले.

The BJP's current status is even stronger than 2014 | २०१४ पेक्षाही भाजपाची सद्यस्थिती भक्कम

२०१४ पेक्षाही भाजपाची सद्यस्थिती भक्कम

googlenewsNext
ठळक मुद्देरावसाहेब दानवे : आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हा काँग्रेसकडून ही लाट असल्याची भावना व्यक्त होत होती. त्यानंतर विधानसभेत दणदणीत यश मिळवून भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. तेव्हाही काँग्रेसकडून लाट ओसरली नसल्याचे बोलल्या जात होते. परंतु दरम्यानच्या बहुतांश निवडणुकीत भाजपाने निर्विवाद सत्ता काबीज केली. त्यामुळे सध्यस्थितीत भारतीय जनता पार्टीची स्थिती २०१४ च्या स्थितीपेक्षाही भक्कम आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकींच्या तयारीकरिता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी वर्ध्यात आले होते. त्यांनी पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे म्हणाले की, २०१४ नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले आहेत. जवळपास ५ हजार सरपंच आहेत, ८१ नगर पालिका भाजपाच्या ताब्यात आहे. १५ महानगर पालिका तर १२ जिल्हा परिषदांवर भाजपाचे वर्चस्व आहेत. एखादी पोटनिवडणूक सोडली तर बाकींवर भाजपानेच मोहोर उमटविली आहे. आम्ही अजेंड्याच्या बाहेर जावूनही अनेक विकासात्मक कामे केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला भरघोष यश मिळेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, आ. रामदास आंबटकर, आमदार अरुण अडसड, आ समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने दादाराव केचे यांची उपस्थिती होती.

एक बुथ, २५ युथ ही संकल्पना
पक्ष बांधणीकरिता राज्यातील २८८ मतदार संघामध्ये २८८ पुर्णवेळ विस्तारक नेमले आहे.कार्यकर्त्यांना एकत्र करुन बुथची बांधणी करण्यात आली आहे. राज्यात ९२ हजार ४०० बुथची बांधणी करण्यात आली आहे. ८८ हजार बुथ प्रमुखांची नेमणूक करुन त्या बुथ प्रमुखाने पन्ना प्रमुख नेमले आहेत. एका बुथवर जवळपास १६ ते १७ पान असून एका पन्ना प्रमुखाला एक पान दिले जाणार आहेत. त्यावर ६० जणांची नावे असून त्या पन्ना प्रमुखाला निवडणूकीपर्यंत या सर्वांना भेटी द्यायच्या आहे.‘एक बुथ, २५ युथ’ ही संकल्पना राबवून निवडणूकीची तयारी सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभानिहाय दौरा करणार
आगामी निवडणूकींचा विचार करुनच राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्यासोबत जालना, संभाजीनगर व मावळचा दौरा केल्यानंतर शनिवारला गडचिरोली व चंद्रपूर तर रविवारी वर्धा व यवतमाळ आणि सोमवारी अमरावती व रामटेक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचीही तयार करुन घेणार असल्याचे सांगितले.
वेगळ्या विदर्भाबाबत अस्पष्ट भूमिका
सत्तेत येताच विदर्भ वेगळा देण्याची घोषणा भाजपाने केली होती. आता सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरीही वेगळ्या विदर्भाचा प्रश्न प्रलंबीतच असल्याने वेगळ्या विदर्भाबाबत दानवे यांना पक्षाची भूमिका विचारली असता त्यांनी अटलबिहारींच्या काळात छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड हे राज्य वेगळे केले तेव्हा नागरिकांनी पेढे वाटले. पण, काँग्रेसने तेलंगणा राज्य वेगळे केले तर गोळ्या खाव्या लागल्या.त्यामुळे राज्याच्या विभाजनाकरिता सर्वांचं एकमत आवश्यक आहे, असे सांगितल्याने वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची भूमिका अद्यापही अस्पष्ट असल्याचे दिसून येते. भाजप नेहमीच छोट्या राज्याच्या समर्थनात राहिलेला आहे असेही ते म्हणाले.

Web Title: The BJP's current status is even stronger than 2014

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.