पेट्रोलपंपाला नव्हे तर नियोजित जागेला भाजपचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 05:00 AM2021-08-23T05:00:00+5:302021-08-23T05:00:07+5:30

पोलीस वेल्फेअरद्वारे होणाऱ्या पेट्रोलपंपाला भारतीय जनता पार्टीचा विरोध नसून ज्या ठिकाणी हा पेट्रोलपंप उभारला जात आहे तो परिसर आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. शिवाय त्या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक आंदोलने होतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील पेट्रोलपंप इतर ठिकाणी हलविण्यात यावा. पोलिसांच्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नाही तर नियोजित जागेला भाजपचा विरोध आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

BJP's opposition to the planned site, not to the petrol pump | पेट्रोलपंपाला नव्हे तर नियोजित जागेला भाजपचा विरोध

पेट्रोलपंपाला नव्हे तर नियोजित जागेला भाजपचा विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पोलीस वेल्फेअरद्वारे पेट्रोलपंप तयार करण्यात येत आहे. पोलीस वेल्फेअरद्वारे होणाऱ्या पेट्रोलपंपाला भारतीय जनता पार्टीचा विरोध नसून ज्या ठिकाणी हा पेट्रोलपंप उभारला जात आहे तो परिसर आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. शिवाय त्या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक आंदोलने होतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील पेट्रोलपंप इतर ठिकाणी हलविण्यात यावा. पोलिसांच्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नाही तर नियोजित जागेला भाजपचा विरोध आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. 
खा. पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर चौकाच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे म्हणून तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट करून घेतले. सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाल्याने सध्या या परिसराचा चेहरा बदलला आहे. पोलीस वेल्फेअरद्वारे पेट्रोलंपपासाठी नाहरकत प्रमाणपत्र घेत असताना सर्व विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचीही एनओसी घेणे क्रमप्राप्त होते. परंतु, तसे झालेले नाही. भविष्यात डॉ. आंबेडकर चौकात होणाऱ्या सामाजिक, राजकीय, समाजप्रबोधन कार्यक्रमांना या पेट्रोलपंपामुळे नक्कीच बाधा होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलपंपाची जागा तातडीने बदलण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. 
पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. पंकज भोयर, किशोर दिघे, प्रमोद राऊत, मिलिंद भेंडे, प्रदीप ठाकूर, वरुण पाठक, मंजुषा दुधबडे, पवन परियाल, महेश आगे, नीलेश किटे आदींची उपस्थिती होती.

तो परिसर आंदोलनस्थळच - डॉ. गोडे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात नेहमीच विविध राजकीय व सामाजिक आंदोलने होतात. अशा वेळी या परिसरात पेट्रोलपंप तयार झाल्यास या मार्गावरील रहदारी वाढेल. त्यामुळे आंदोलनांवरही मर्यादा येतील. डॉ. आंबेडकर पुतळा परिसर हा आंबेडकरी जनतेसाठी श्रद्धास्थान असून, पेट्रोलपंपाची जागा तातडीने बदलली पाहिजे, असे याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी स्पष्ट केले.

पंप हटविण्याच्या मागणीला भाजपचा पाठिंबा-  भोयर
- डॉ. बाबासाहेब पुतळा परिसरात उभारल्या जाणाऱ्या पेट्रोलपंपाची जागा बदलण्यात यावी, अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी माहिती यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर व्हावा - राऊत
- उभारल्या जात असलेल्या पेट्रोलपंपाला आंबेडकरी जनतेचा विरोध नाही; पण ज्या जागेवर हा पंप उभारला जात आहे, त्या जागेला विरोध आहे. आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करून पेट्रोलपंप इतर ठिकाणी हलविण्यात यावा, असे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत यांनी सांगितले.

 

Web Title: BJP's opposition to the planned site, not to the petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.