वर्धा जिल्ह्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट; तीसहून अधिक मजूर भाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:39 AM2021-02-03T11:39:04+5:302021-02-03T12:47:50+5:30
Wardha News भूगाव येथे असलेल्या उत्तम गाल्वा मेटॅलिक लि. या केमिकल फॅक्टरीत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्फोट होऊन तीसहून अधिक मजूर भाजल्याची घटना घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: भूगाव येथे असलेल्या उत्तम गाल्वा मेटॅलिक लि. या केमिकल फॅक्टरीत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्फोट होऊन तीसहून अधिक मजूर भाजल्याची घटना घडली आहे. तीन गंभीर जखमी कामगारांना नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे
या स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समोर आले आले नाही. दरम्यान सर्व जखमी मजुरांना सावंगी येथील दत्ता मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी फॅक्टरीच्या गेटसमोर पत्रकारांना रोखून धरण्यात आले आहे. घटनास्थळी सावंगी ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे आपल्या चमुसह घटनास्ताली दाखल झाले आहे. ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्तम गलवा कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी कामगार अधिकऱ्या मार्फत येईल अशे आदेश मी निर्गमित करीत आहे. चौकशी अंती दोषींवर कारवाई प्रस्तावित होईल असे घटनास्थळाची पाहणी केल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले