सिलिंडरच्या स्फोटात घराची राख

By admin | Published: April 27, 2017 12:41 AM2017-04-27T00:41:46+5:302017-04-27T00:41:46+5:30

मेणखात येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. यात संपूर्ण घर जळून खाक झाले.

In the blast of cylinders, the house ash | सिलिंडरच्या स्फोटात घराची राख

सिलिंडरच्या स्फोटात घराची राख

Next

मेणखात येथील घटना : जीवित हानी टळली
समुद्रपूर : मेणखात येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने घरात कुणी नसल्याने जीवितहानी टळली. असे असले तरी एक बैल भाजला असून एकाच्या डोळ्याला आस लागली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
जाम (चौरस्ता) येथून तीन किमी अंतरावरील मेणखात येथील ताराबाई पांडुरंग उरकुडकर (५५) यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. यात भांडे, धान्य, कपडे जळून खाक झाले. घरातील तीन तोळे सोने, दहा हजार रुपये रोख जळाले. ताराबाई घरी एकट्याच राहतात. घटनेच्या वेळी गॅसवर चहा ठेवून त्या बोर आल्याने जीवितहानी टळली; पण घराचे छप्पर उडाले. आगीचे लोळ ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या गोठ्यापर्यंत गेले. यात गोठा, कुटार, थ्रेशर इंजिन जळाले व बैल भाजला गेला. ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या डोळ्याला आस लागली. रमेश विहीरकर, कैलाश उईके, विठ्ठल सुरजूसे, राहूल उईके, दिनकर मंगरूळकर, गोपाल कच्छवा, भगवान महाकाळकर, देविदास दाते, गजानन दाते, दिनेश दाते यासह हिंगणघाट येथील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. तलाठी सुधीर पाटील, उमेश पोटे यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला.(तालुका प्रतिनिधी)

दोन एकरातील डाळींब स्वाहा
नारायणपूर : पाठर येथील ज्ञानेश्वर किसनाजी धोटे यांच्या दोन एकर शेताला आग लागली. यात नांदी फाऊंडेशन अंतर्गत लागवड केलेल्या डाळींब पिकाची ६०० ते ७०० झाडे, ओलितासाठी वापरण्यात येणारे ड्रीप पाईप व इतर साहित्य जळून खाक झाले. यात अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी घडली. शेतकऱ्याने तलाठी व कृषी सहायकांना माहिती दिली. वृत्त लिहिपर्यंत ते घटनास्थळी पोहोचले नव्हते. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

 

Web Title: In the blast of cylinders, the house ash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.