अधिकाऱ्यांचे आशीर्वाद अवैध व्यवसायाला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 08:25 PM2018-12-26T20:25:16+5:302018-12-26T20:25:33+5:30

सध्या तळेगांव परिसरात विविध अवैध व्यवसायाला ऊत आला आहे. अर्थपूर्ण संबधामुळे अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याची चर्चा परिसरात जोरात सुरु आहे.

The blessings of the officers fall into illegal business | अधिकाऱ्यांचे आशीर्वाद अवैध व्यवसायाला ऊत

अधिकाऱ्यांचे आशीर्वाद अवैध व्यवसायाला ऊत

Next
ठळक मुद्देघाट बंद तरीही रेतीचोरी : सरकारी कामावर वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : सध्या तळेगांव परिसरात विविध अवैध व्यवसायाला ऊत आला आहे. अर्थपूर्ण संबधामुळे अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याची चर्चा परिसरात जोरात सुरु आहे.
कोणताही रेती घाट सुरू नसतांना गावांत खुलेआम रेतीचे ढिगारे पाहावयास मिळत आहे. रेती तस्कर रेती आणतात कोठून त्यांना याला अभय कुणाचे असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे निर्माण झाले आहे. तळेगावात सर्रासपणे सुरू असलेल्या कामावर नदीची काळी तसेच कन्हान रेतीचे साठे दिसून येत आहे.
तळेगाव परिसरात अवैध रेतीचे तस्कर कोण , दारु, सट्टा याचा व्यवसाय कोण करतो याची माहीती पोलीस, महसूल प्रशासनाला आहे. परंतु कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारसवाडा परिसरातील नागरिकांकडून मिळालेल्या माहीती नुसार तेथील एका सत्ताधारी राजकीय नेत्याच्याच शेतात अवैध रेतीची साठवणूक केली आहे.
वनविभागाच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात तळेगांव परिसरात दारू,रेतीचा व अवैध शिकारीचा व्यवसाय सुरु आहे. कोणतीही कारवाई केल्या जात नाही. त्यामुळे गावातील शांतता भंग होत आहे. तळेगांव परिसरात तर दारू, सट्टा, व रेतीचा व्यवसाय शासनाची मान्यता असल्यागत खुलेआम सुरु आहे. यावर कोणाचाच वचक नसल्याचे चित्र सध्या परिसरात बघावयास मिळत आहे. रेतीचे भाव कडाडलेले असताना रेती तस्कर कोट्यावधी रूपये या अवैद्य धंद्यातून कमावित आहे. जिल्ह्यात सर्वत्र याच भागातून रेतीचा पुरवठा केला जात असल्याचे समजते.
सरकारी कामांना मुभा, गरिबांवर कारवाई
घाटाचे लिलाव झालेले नाही.तरीही तळेगाव परिसरासह विविध भागात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आदीतंर्गत सुरू असलेल्या कामावर रेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. सरकारी कामाच्या ठेकेदारांना ही मुभा का? असा सवाल नागरिक करीत आहे. मात्र सामान्य नागरिकांनी बंडीभर रेती घरगुती कामाकरिता आणली तरी बंडी जप्त करण्याची कारवाई केली जाते, हे विशेष.

Web Title: The blessings of the officers fall into illegal business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.