समाजाचे ऋण फेडण्याची रक्तदान हीच संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 05:00 AM2021-07-04T05:00:00+5:302021-07-04T05:00:20+5:30
कोरोना संकटाच्या काळातही राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण राज्यभर ‘लोकमत - रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेऊन ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून हिंगणघाट येथील साई सभागृह, नंदोरी रोड, हिंगणघाट येथे शनिवारी महारक्तदान शिबिर पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्रद्धेय स्व. स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त साई सभागृह, नंदोरी रोड, हिंगणघाट येथे आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या हस्ते झाले. आपण दान केलेले रक्त एखाद्याचे प्राण वाचवू शकते; त्यामुळे कोविड संकटकाळात प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करणे महत्त्वाचे असून, समाजाचे ऋण फेडण्याची खरी संधी ही रक्तदानातून मिळते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी रक्तदान करावे, असे प्रतिपादन अतुल वांदिले यांनी याप्रसंगी केले.
कोरोना संकटाच्या काळातही राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण राज्यभर ‘लोकमत - रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेऊन ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून हिंगणघाट येथील साई सभागृह, नंदोरी रोड, हिंगणघाट येथे शनिवारी महारक्तदान शिबिर पार पडले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भास्कर कलोडे यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वितेकरिता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, रमेश घंगारे, उमेश नेवारे, मारोती महाकाळकर, जगदीश वांदिले, राजू सिन्हा, बच्चू कलोडे, प्रशांत एकोणकर, निखिल भुते, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, गोलू भुते, गोपाल कांबळे, हरीश वाघ, जितू रघाटाटे, मिथुन चव्हाण, राजू खडसे, आदींनी सहकार्य केले. रक्तसंकलनाचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतील चमूने केले.
रक्तदानातून यांनी अर्पण केली आदरांजली
- हिंगणघाट येथील शिबिरात रूपेश लाजूरकर, दीपक चंदनी, कीर्तिकुमार ठाकरे, आशिष ठाकरे, सुनील मेश्राम, सचिन कापसे, मयूरी कापसे, दीपक धात्रक, विश्रांती कुटेवार, अनिकेत हिवाळे, विक्रम सैनी, रामेश्वर बावणे, अमित नागपुरे, सचिन भडे, संदीप रोडे, सागर सहारे, धीरज कोल्हे, आकाश पिल्लेवार, नीलेश कोयचाडे, विपिन रेवतकर, नीलेश शेंडे, आशिष कापकर, संदीप भोयर, अनंता माडे, पंकज परटक्के, योगीता कावळे, नितीन काळे, अमोल मुळे, सर्वेश सोनकुसरे, शुभांगी धकाते, अक्षय पोटफोडे, राजू मुडे, अनिल सूर्यवंशी, आदींनी रक्तदान करून श्रद्धेय बाबूजींना आपली आदरांजली अर्पण केली.
आज सेलू येथे रक्तदान शिबिर
- ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत आज, रविवारी कुंभारे सभागृह, शीतलदास मठ, मेन रोड, सेलू येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू रक्तसंकलन करणार आहे.