पालिका कर्मचाऱ्यांची उपविभागीय कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:57 PM2018-05-29T22:57:51+5:302018-05-29T22:58:05+5:30

नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते यांच्या कथित अन्याय धोरणाविरुद्ध मंगळवारी नपच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. दुपारी अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात नप कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले. या संपातून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी येत्या दोन दिवसात योग्य निर्णय न झाल्यास अत्यावश्यक सेवाही ठप्प करण्याचा इशारा अ‍ॅड. कोठारी यांनी दिला आहे.

BMC workers strike at sub-divisional office | पालिका कर्मचाऱ्यांची उपविभागीय कार्यालयावर धडक

पालिका कर्मचाऱ्यांची उपविभागीय कार्यालयावर धडक

Next
ठळक मुद्देकामबंद आंदोलन : मुख्याधिकाºयांकडून कामात दबावतंत्राच्या वापराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते यांच्या कथित अन्याय धोरणाविरुद्ध मंगळवारी नपच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. दुपारी अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात नप कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले. या संपातून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी येत्या दोन दिवसात योग्य निर्णय न झाल्यास अत्यावश्यक सेवाही ठप्प करण्याचा इशारा अ‍ॅड. कोठारी यांनी दिला आहे.
या संपाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज दुपारी नप परिसरात पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना अ‍ॅड. कोठारी यांनी नप मुख्याधिकारी दंडवते यांच्या अरेरावीपूर्ण कार्याचा आढावा वाचला. यावेळी नगरसेवक आफताब खान, नीता धोबे, शुभांगी डोंगरे, प्रकाश राऊत, मनीष डोंगरे या नगरसेवकांनी .व्यथा मांडल्या. यावेळी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी यानी तांत्रिक पदावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करून त्याच्या जागेवर अतांत्रिक व कनिष्ठ पदावरील कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. या प्रकारामुळे वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पदाचे हणन केल्याचे दिसून येते असा आरोप करण्यात आला. विविध विभागातील जवळपास २०० कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे कार्यालयातील दैनंदिन कामे खोळंबली आहे. रोजंदारी कर्मचारी यांची शैक्षणिक पात्रता व अनुभव असतांना सुद्धा त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देऊन त्यांच्या बदल्या कनिष्ठ पदावर करून त्यांना मानसिक त्रास दिल्या जात आहे. या सर्व अनागोंदीत नपचे दीड कोटींचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बांधकाम विभागातील २०० नागरिकांचे बांधकाम परवाना प्रस्ताव कार्यालयात प्रलंबित आहे. मोजणी क प्रतची सक्ती केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गुंठेवारी प्रकरणे नपकडे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होत असून नपला यातून ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावेळी माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, नप कर्मचारी संघाचे अध्यक्ष विजय खोब्रागडे व पदाधिकारी उपस्थित होते.
संप बेकायदेशीर -मिनींनाथ दंडवते
नप कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरू झालेला संप बेकायदेशीर असून झाल्या काही चुका असल्यास त्याची तक्रार जिल्हाधिकारी किंवा नगर विकास अधिकारी यांच्याकडे करायला पाहिजे. मी कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे नप मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते यांनी सांगितले.
ते म्हणाले, या पूर्वी या नपमध्ये कामाच्या नेमणुका नव्हत्या, हजेरी कोण कुठे लावतो याचा थांगपत्ता नव्हता. आता दररोज हजेरी लावून काम करावे लागत आहे. जे अतिरिक्त कर्मचारी होते ते रिक्त जागेवर भरले. ठेकेदारांची माणसे कमी करून नपचा पैसा वाचविला असल्याचे ते म्हणाले.

Web Title: BMC workers strike at sub-divisional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.