बोगस बियाणे विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:41 AM2023-06-15T11:41:10+5:302023-06-15T11:42:13+5:30

बनावट बियाण्यांची ७४ पाकिटे जप्त : वर्ध्यातील कारखाना उद्ध्वस्त

Bogus seed sale racket traces its roots to Uttar Pradesh, 74 packets of fake seeds seized; Factory destroyed in Wardha | बोगस बियाणे विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत

बोगस बियाणे विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत

googlenewsNext

वर्धा : वर्ध्यातील म्हसाळा परिसरातील इमारतीत बोगस बियाण्यांचा चक्क कारखानाच चालविला जात असल्याचा छडा लावत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. याच प्रकरणात दहावा आरोपी कोमल कांबळे (रा. सोनेगाव बेला, जि. नागपूर) याला अटक करून कृषी सेवा केंद्रातून बोगस कपाशी बियाण्यांची ७४ पाकिटे जप्त केली आहेत.

पोलिसांनी विविध नामांकित कंपन्या व कपाशीच्या बनावट बियाण्यांची २९६ पोती जप्त करून तब्बल एक कोटी ५५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बोगस बियाणे विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे संपूर्ण राज्यात पसरले असल्याने पोलिसांकडून त्या दिशेने जलदगतीने तपास सुरू असल्याची माहिती आहे.

आतापर्यंत गुजरातच्या दोघांना दिले १७ लाख रुपये

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजू जयस्वाल याने गुजरात येथील अहमदाबाद जिल्ह्यातील ईडर येथील राजूभाई आणि महेंद्रभाई यांच्याकडून बोगस बियाणे मागवले होते. त्याचे आतापर्यंत आरोपीने १७ लाख रुपये त्यांना दिल्याची माहिती आहे. मात्र, १२ रोजी पुन्हा दोन ट्रक बोगस बियाणे मागवले. पोलिसांनी मात्र आरोपीचा डाव उधळून लावला.

पशुचिकित्सक करायचा ‘सेलिंग’

पोलिसांनी हमदापूर येथून अटक केलेला आरोपी विजय अरुण बोरकर हा जनावरांचा डॉक्टर होता. तो गावागावांत जनावरांवर उपचारासाठी जाताना बोगस बियाण्यांची पाकिटे घेऊन त्याची शेतकऱ्यांना विक्री करीत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा डाव उधळून लावला.

आरोपींना २१ पर्यंत पोलिस कोठडी

पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी आरोपी मुख्य सूत्रधार राजू सुभाष जयस्वाल (वय ३३,राजकुमार यादव वडमे(वय ३९) दोघेही रा. रेहकी, ता. सेलू, जि. वर्धा, विजय अरुण बोरकर (वय ३७) गजानन सूर्यभान बोरकर (वय ४५) दोघेही रा. हमदापूर,जि. वर्धा), हरीशचंद्र वासुदेव उईके (१८, रा. ऐजोसी, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश), धरमसिंग बंरीहार यादव (२७, रा. उत्तर प्रदेश), सुदामा शिवा सोमकुवर (२७)अमन शेषराव धुर्वे(१८) दोघेही रा. लास, जि. छिंदवाडा), महमूद गफ्फार चव्हाण (४५, रा. तिवरंग, जि. यवतमाळ), कोमल कांबळे (रा. सोनेगाव बेला, जि. नागपूर) यांना न्यायालयात हजर केले असता, आरोपींना २१ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: Bogus seed sale racket traces its roots to Uttar Pradesh, 74 packets of fake seeds seized; Factory destroyed in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.