पुस्तकाची भविष्यात मोलाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:30 PM2018-03-19T22:30:33+5:302018-03-19T22:30:33+5:30

शालेय जीवनात आपले भावी भविष्य उज्वल होण्यास आपली पुस्तके आणि शालेय वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉ. बाबासाहेबांनी असंख्य पुस्तकांचे वाचन करून ज्ञानार्जन केले.

The book has an important role in the future | पुस्तकाची भविष्यात मोलाची भूमिका

पुस्तकाची भविष्यात मोलाची भूमिका

Next
ठळक मुद्देप्रशांत येवतीकर : ‘ज्ञान की’ या वाचनालय व अभ्यासिकेचा प्रारंभ

आॅनलाईन लोकमत
आर्वी : शालेय जीवनात आपले भावी भविष्य उज्वल होण्यास आपली पुस्तके आणि शालेय वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉ. बाबासाहेबांनी असंख्य पुस्तकांचे वाचन करून ज्ञानार्जन केले. घटना लिहिली. भारतरत्न झाले. विद्यालयातील ‘ज्ञान की’ या वाचनालयाचे आपण अध्ययन करावे. ‘वाचाल तर वाचाल’ हे ब्रीद नेहमी लक्षात ठेवावे, असे मत अप्पर वर्धा प्रकल्पाचे वरिष्ठ अभियंता प्रशांत येवतीकर यांनी व्यक्त केले.
आदर्श विद्यालयात ‘ज्ञान की’ वाचनालय व अभ्यासिकेचे उदघाटन येवतीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेश सोळंकी तर अतिथी म्हणून रवींद्र कडू, रावसाहेब घाटे उपस्थित होते. पुणे येथील प्रदीप लोखंडे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात साकारलेल्या ‘ज्ञान की’ वाचनालयाने अवघ्या चार वर्षांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार १९० शाळांत वाचनालये सुरू केलीत. ८ लाख ५६ हजार विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत. १ लाख ३ हजार विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर पुस्तकाबद्दल अभिप्राय लिहून प्रदीप लोखंडे व देणगीदारांना पाठविले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक कामाच्या दिवशी ३ वाचनालये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुरू होणार असून जगाच्या ग्रामीण वाचन संस्कृतीच्या इतीहासात पुण्यातील प्रदीप लोखंडे यांच्या ‘ज्ञान की’चा सर्वात मोठा उपक्रम राहील, असेही सोळंकी यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकातून वाचनालय प्रमुख सीमा दुधाट यांनी वाचनालयाकरिता २०० पुस्तकांची देणगी ‘ज्ञान की’ पुणे यांच्या माध्यमातून आदर्श विद्यालयास शंकुतला मुत्था, डॉ. प्रवीणा जैन यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. संचालन सुनंदा शिरभाते यांनी केले तर आभार प्रमिला मस्की यांनी मानले. कार्यक्रमाला नारायण कुसरे, विवेक राऊत, अशोक वानखेडे दिवाकर पाटील, विजय नानवाणी आदींनी सहकार्य केले.

Web Title: The book has an important role in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.