तुरीची सुधारित जात ठरली शेतकऱ्यासाठी वरदान
By admin | Published: January 26, 2017 01:59 AM2017-01-26T01:59:42+5:302017-01-26T01:59:42+5:30
परंपरागत शेतीची कास सोडून सुधारित जातीच्या वाणाचा वापर केल्यास न परवडणारी शेती फायद्याची होऊ शकते. हा
अधिकाऱ्याकडून पाहणी : बोथली येथील शेतकऱ्याची यशोगाथा
फनिंद्र रघाटाटे ल्ल रोहणा
परंपरागत शेतीची कास सोडून सुधारित जातीच्या वाणाचा वापर केल्यास न परवडणारी शेती फायद्याची होऊ शकते. हा अनुभव बोथली येथील अल्पभूधारक आदिवासी शेतकरी श्यामराव लक्ष्मण कुरवाडे यांना आला. त्यांची तुरीची शेती इतर शेतकऱ्यांना अनुकरणीय व प्रेरणादायी ठरणारीच आहे.
बोथली येथील श्यामराव कुरवाडे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांनी एक एकर शेतात मध्यप्रदेशातून तुरीचे बियाणे आणून त्यांची सोयाबीनमध्ये लागवड केली. अधिक खर्च न करताही आज शेतात तुरीचे पीक उभे आहे. त्यात पाच व सहा दाण्यांची शेंग असून दाने चांगले टपोरे आहेत. एक एकरात १२ ते १५ क्विंटल उत्पादन होणार, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. पेरणी, निंदण, एक खताची मात्रा एवढ्या अल्प खर्चात त्यांना होणारे उत्पादन नक्कीच फायद्याचे आहे. ही शेती इतर शेतकऱ्यांना अनुकरणीय आहे.
शेताला नुकतीच कृषी सहायक एस. एस. खोंडे यांनी भेट दिली. याप्रसंगी सदर शेतकऱ्याला पुढील वर्षासाठी तुरी बाजारात न विकता बियाणे म्हणून विकण्याचा सल्ला दिला. या तुरीची कापणी करून त्यांची मळणी करताना कुठल्याही प्रकारची भेसळ होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्यात. सुधारित बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते, हेच सदर शेतकऱ्याने यातून सिद्ध केले आहे. पेरणीच्या वेळी वाणाची शहानिशा करून लागवड केल्यास शेतीतील नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल, हे वास्तव आहे.
पारंपरिक पिकांतही नफ्याची शेती
४कापूस, सोयाबीन, तूर, गहू, चना ही पिके पारंपरिक आहे. गत कित्येक वर्षांपासून शेतकरी ही पिके घेत आला आहे. या पिकांमध्ये नवनवीन आणि सुधारित वाणाच्या बियाण्यांचा वापर केल्यास तोट्यातील शेती नफ्याची होऊ शकते, हे बोथली येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही सुधारित वाणांचा वापर करून शेती नफ्याची करणे गरजेचे झाले आहे.