केळी रोपट्यांच्या बचावासाठी बोरूंची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:41 PM2018-05-09T23:41:43+5:302018-05-09T23:41:43+5:30

वडगाव (कला) येथील युवा व प्रगतशील शेतकरी पप्पू बोबडे यांनी स्वत:च्या दोन एकर शेतात केळीच्या तीन हजार रोपांची मार्च महिन्याच्या तळपत्या उन्हात लागवड केली. त्या रोपांच्या सभोवताल बोरूंचे बियाणे टाकले. ते केळीच्या रोपाच्या बरोबरीने वाढले.

Boro cultivation to save banana seedlings | केळी रोपट्यांच्या बचावासाठी बोरूंची लागवड

केळी रोपट्यांच्या बचावासाठी बोरूंची लागवड

googlenewsNext
ठळक मुद्देमार्च महिन्यात लावली रोपे : उन्हापासून वाचविण्यासाठी युवा शेतकऱ्याचा प्रयोग

प्रफूल्ल लुंगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : वडगाव (कला) येथील युवा व प्रगतशील शेतकरी पप्पू बोबडे यांनी स्वत:च्या दोन एकर शेतात केळीच्या तीन हजार रोपांची मार्च महिन्याच्या तळपत्या उन्हात लागवड केली. त्या रोपांच्या सभोवताल बोरूंचे बियाणे टाकले. ते केळीच्या रोपाच्या बरोबरीने वाढले. यामुळे केळीच्या रोपांचा उन्हापासून बचाव होत आहे.
शेती हा व्यवसाय शेतकºयांना तोट्याचा ठरत आहे; पण पप्पू बोबडे यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था असल्याने ते शेतात नवनवीन प्रयोग करतात. अनेक वर्षांपासून केळीची बाग लावत असून इतरही पिके ते घेतात. यातून त्यांना अपेक्षित नफा मिळतो. केळी पिकाची त्यांना खूप आवड आहे. सेलू तालुक्याची केळी महाराष्ट्रासह इतरही राज्यात यापूर्वी लौकिकास पात्र ठरली होती. यामुळे केळीला गतवैभव प्राप्त व्हावे हा त्यांचा मानस आहे; पण सिंचनासोबतच अनेक अडचणींमुळे तालुक्यात केळींच्या बागांची संख्या कमी होत आहे. केळीच्या रोपांच्या सभोवताल बोरू लावल्याने उन्हापासून केळींचा बचाव होतो. प्रत्येक रोपाला स्वतंत्र सावली मिळते. यामुळे प्रचंड उकाड्यातही केळीच्या रोपांना थंडावा मिळत राहतो. उन्हामुळे केळीचे रोपटे भाजत नाही. पावसाळा सुरू होताच केळी रोपांच्या सभोवताल बोरूंचे झाडे तोडून ते जमिनीत सडू द्यायची. त्याचे सेंद्रीय खत तयार होते व ते केळीला पोषक ठरते, असा त्यांचा अनुभव आहे.
पप्पू बोबडे यांनी जोडधंदा म्हणून सेलू येथे केळी पिकविणारा सान्वी रॅपनिंग सेंटर उद्योग सुरू केला. इतर शेतकºयांच्या बागेतून ते केळी विकत घेत प्रक्रिया करतात व चिल्लर, ठोक विक्रेत्यासह नागपूर-वर्धा आदी ठिकाणी वाहनाद्वारे माल पाठवितात. सिंचनाची आधुनिक सोय असल्यास शेती व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग केल्यास नफा मिळतो, हे त्यांनी सिद्ध केले.

केळीची बाग दरवर्षी माझे वडील लावत आले. त्यांचा केळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. केळीची बाग लावणे सुरू राहिले; पण व्यवसाय त्यांनी बंद केला. यात त्यांचे नाव होते. मी शेतीकडे लक्ष द्यायला लागलो व शेतीत नवीन प्रयोग सुरू केले. केळीची बाग दरवर्षी लावतो. यंदा हा प्रयोग केला. वडिलांचा केळीचा व्यवसाय बंद झाल्याचे शल्य होते. मी एसीद्वारे केळी पिकविण्याची पद्धत अंमलात आणून उद्योग पत्नीच्या नावे बॅँकेच्या आर्थिक साह्याने सान्वी बनाना रॅपनिंग व केला सप्लायर्स सुरू केला. शेतीला हा जोडधंदा असल्याने मदत झाली.
- पप्पू बोबडे, शेतकरी, वडगाव (कला), ता. सेलू.

Web Title: Boro cultivation to save banana seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.