दोघांना पाच दिवसांचा पीसीआर

By admin | Published: July 14, 2017 01:26 AM2017-07-14T01:26:59+5:302017-07-14T01:26:59+5:30

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बनावट डिजीटल सह्यांचा वापर करून जातीचे व नॉनक्रिमिलीयर सारखे

Both have a five-day PCR | दोघांना पाच दिवसांचा पीसीआर

दोघांना पाच दिवसांचा पीसीआर

Next

बनावट जात प्रमाणपत्राचे प्रकरण : आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बनावट डिजीटल सह्यांचा वापर करून जातीचे व नॉनक्रिमिलीयर सारखे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या असामाजिक तत्वांचे नुकतेच पितळ उघडे पाडण्यात आले. या प्रकरणातील आकाश मारोती खंडाते रा. देवळी व धर्मपाल कांबळे रा. कोल्हापूर सिंगारवाडी या दोन्ही आरोपीवर देवळी पोलिसांचे वतीने भादंवि ४२०, ४६८, ४७१, ४८४, ४६५, ४६६, १८६, १९७, ३४ तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदा ७४, ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलीस कोठडीच्या पहिल्याच दिवशी गुरूवारचे सकाळी मुख्य आरोपी खंडाते यांची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणातील आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलीस सुत्रानुसार आरोपी खंडाते व कांबळे या दोघांचा देवळीत वेगवेगळ्या ठिकाणी जॉब सेंटर आहे. या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा गोरखधंदा सुरू होता. कागदपत्रांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खंडाते याने तीन महिन्यापुर्वी निकिता वाघमारे यांचे दिघी (बोपापूर) चे नावाने नोंदणी असलेले सेतू केंद्र किरायाने घेतले. न.प. च्या बाजूला असलेल्या स्वत:च्या जॉब सेंटर मध्ये हे सेतू केंद्र थाटण्यात आले. या ठिकाणी सर्व बनावट सह्याचे दाखले मिळत होते. गरजूंना शेकडो दाखले देण्यात आले. कोणत्याही कागदपत्राशिवाय याठिकाणी जातीचे व नॉनक्रिमिलीयर सारखे प्रमाणपत्र मिळत असल्याने गरजुंनी दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजली. असेच एक बनावट प्रमाणपत्र तहसीलदार भागवत यांच्याकडे आले असता आरोपी खंडाते याचे नाव समोर आले. जिल्हाधिकारी यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार तपासणी पथकाने खंडाते याचे जॉब सेंटरवर धाड टाकली. यात संगणकात दोन हजार प्रमाणपत्रे असल्याचे तसेच बहुतांश प्रमाणपत्र बारकोड खोटे असल्याचे आढळून आले.
खंडाते यांचेवर या आधीही गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे. एका राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून खंडाते याने नुकतीच पार पडलेली पालिका निवडणूक लढविली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: Both have a five-day PCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.