स्वस्त धान्य दुकानातील बायोमेट्रिक वादाच्या भोवºयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 10:18 PM2017-10-03T22:18:46+5:302017-10-03T22:19:00+5:30
शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य वाटप केले जाते. यासाठी सुधारित शासन निर्णयाप्रमाणे बायोमट्रिक प्रणाली लागू करण्यात आली. लाभार्थ्यांच्या हाताचा थम्ब घेण्यासाठी पॉस मशीन मिळाल्या; पण या मशीन असंख्य लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसेच स्वीकारत नाही. यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळणेच कठीण झाले आहे.
स्वस्त धान्य दुकानांत लावलेल्या मशीनचा दर्जा अत्यंत निम्न स्वरूपाचा असल्याने एकूण कारभारच वादाच्या भोवºयात अडकला आहे. ऐन दिवाळी या मुख्य सणाच्या काळात नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागण्याची स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. या प्रकरणी साहुर, माणिकवाडा, भारसवाडा, आष्टी, अंतोरा येथील लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना तक्रार केल्या. यात यंत्रणा सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे.
आधार कार्ड, बँक खाते, पासपोर्ट फोटो व कुटुंबाची माहिती, असा अर्ज एक नव्हे तर चार-पाच वेळा भरून घेण्यात आला. पुरवठा विभागाने तयार केलेल्या रजिस्टरमध्ये असंख्य मृतक, गाव सोडून गेलेल्या लोकांची नावे समाविष्ट होती. ती नावे वगळण्याची कारवाई बरेच दिवस झालीच नाही. याचा परिणाम धान्याच्या वितरणावर झाला आहे. शासनाने अल्पभूधारक शेतकºयांना सरसकट दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करून लाभ दिला आहे. अल्प भावात धान्य मिळत असल्याने अनेक श्रीमंत लोकही यात धान्याची उचल करीत असल्याचे समोर येत आहे. लाखो रुपये सबसिडीवर खर्च होत असताना यंत्रणाच ढिसाळ झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानात पॉस मशीन पाहायला मिळत आहे. शासनाने सुविधा अत्याधुनिक केल्या नाहीत. यामुळे हा सर्व पेच निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती भीषण आहे. शेतकरी व मजूर वर्ग संकटात सापडला आहे. अशावेळी कोट्यवधीचा गैरप्रकार करणाºयांना केवळ बायोमेट्रीकच यंत्रणा लागू करून सुट देण्यात आली आहे. यात गरीबांवरच अन्याय केला जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
याबाबत आष्टी येथील जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष मकरंद देशमुख यांनीही अन्न-नागरी-पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडे तक्रार केली आहे. यात सर्व लाभार्थ्यांना धान्य वितरण करा, पॉस मशीनवर काम होत नसेल तर पूर्वीप्रमाणे वितरण कायम ठेवा, अशी मागणी करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात ७० टक्के आधार कार्डची जोडणी झालेली आहे. केंद्र बंद असल्याने अनेकांनी अद्यापही आधार कार्ड काढलेले नाही. शिधापत्रिका तथा आधार कार्डवरील नावांतही त्रूट्या आहेत. या सर्वांमुळे समस्या सुटताना दिसत नाहीत. पॉज व बायोमॅट्रीक प्रणाली वीज पुरवठ्यावर चालणाºया असून ग्रामीण भागात भारनियमन असल्याने याचाही फटका बसत आहे.
पाच गावांतील लाभार्थ्यांच्या जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी
साहूर, माणिकवाडा, भारसवाडा, आष्टी आणि अंतोरा या गावांतील नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकाºयांकडे केल्या आहेत. यात बायोमेट्रिक यंत्रणा कमकुवत ठरत असून पॉझ मशीनमध्ये बोटांचे ठसे येत नसल्याचे नमूद आहे. शिवाय नवीन यंत्रणा उपयोगी पडत नसेल तर जुन्याच पद्धतीनुसार धान्याचे वाटप करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
स्वस्त धान्य दुकानांतून सर्वांना धान्याचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बायोमेट्रिक तथा पॉस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. यात गडबड असल्यास खात्री करून दुसºया दिल्या जाऊ शकतात; पण शासनाच्या नियमानुसारच अंमलबजावणी करावी लागणार आहे.
- सीमा गजभिये, तहसीलदार, आष्टी (श.)