जिल्ह्यात बोंडअळीचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:41 PM2017-11-21T23:41:14+5:302017-11-21T23:43:33+5:30
जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. कपाशी उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ योग्य पावले उचलावी शिवाय नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येते. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. यंदाच्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.
पूर्वीच जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांमुळे हवालदिल झाला आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत मिळून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, राजेंद्र लढी, अरविंद मसराम, आदित्य कोकडवार, किशोर हेमने, वैभव चतुरकर, सागर हिवरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागणीचा विचार न झाल्यास आंदोलन
बोंडअळी हे सध्या जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांवर ओढावलेले मोठे संकट आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. हवालदिल झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या शिवाय निवेदनातील मागण्यांवर येत्या दहा दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी प्रहारने केली आहे. मागण्यांचा विचार न झाल्यास प्रहारच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.