पवनारात सेवा सोसायटीच्या निवडणुकीवर बहिष्कार
By admin | Published: June 15, 2017 12:47 AM2017-06-15T00:47:50+5:302017-06-15T00:47:50+5:30
पवनार विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम चुकीचा व दिशाभूल करणारा जाहीर केल्याचा आरोप करीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पवनार विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम चुकीचा व दिशाभूल करणारा जाहीर केल्याचा आरोप करीत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मतदारांनी घेतला आहे. तसेच या गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वर्धा यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवडणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या मतदारांमध्ये वसंत उमाटे, जगदीश वाघमारे, अशोक हिवरे, नारायण देशमुख, रवींद्र बोकडे, अशोक भट, मुरलीधर वैद्य, अब्दुल मुनाफ अब्दुल अजीज, महादेव देवतळे यांच्यासह १४ मतदारांचा समावेश आहे. पवनार विविध सेवा सहकारी सोसायटीचा निवडणूक कार्यकारी जाहीर करण्यात आला. तो चुकीचा व दिशाभूल करणारा असून सदर कार्यक्रम पत्रिकेत सर्वसाधारण गट असा उल्लेख केला. उमेदवारी अर्ज भरताना विचारणा केली असता तीन वेळा सर्वसाधारण गटात कुणालाही अर्ज भरता येतो असे सांगून उपविधीबाबत काहीही सांगितले नाही. उपविधीत सर्वसाधारण कर्जदार गट असा उल्लेख असताना हेतूपुरस्पर निवडणूक कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख न करता सर्वसाधारण गट असा उल्लेख केला. या गटातील अर्ज फेटाळल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
सेवा सहकारी संस्थेच्या उपविधीप्रमाणे १३ पैकी ८ संचालक हे सर्वसाधारण कर्जदार गटातून तर पाच संचालक हे राखीव जागांमधून निवडावयाच्या आहेत.बहिष्कार टाकणाऱ्या गटाच्या उमेदवारांचे ८ अर्ज फेटाळण्यात आले. आपल्याकडे अपील करण्यात आली. त्यातही ते फेटाळण्यात आले. उपविधीनुसार अर्ज भरण्यात आले नव्हते.
- ए.बी.कडू, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, वर्धा