पवनारातील ‘ब्रह्म विद्या मंदिर’ स्त्री सक्षमीकरणाचे विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:00 AM2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:33+5:30
महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले. इंग्रजा विषयी बापूंच्या विचार व मतांवर विनोबा प्रभावित होऊन दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम त्यांच्यासाठी मातृस्थान बणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार/सेवाग्राम : भूदान चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र लढ्यातील पहिले सत्याग्रही तसेच महान विचारांचे क्रांतीदूत आचार्य विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ चा नारा देत पवनार गाठले. येथील धामनदीच्या तीरावर परमधाम आश्रमाची निर्मिती करुन ‘ब्रम्ह विद्या मंदिर’ स्थापन केले. या मंदिरातून स्त्री सक्षमीकरणाकरिता पाऊले उचलण्यात आली असून त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. आजही त्यांचे हे कार्य अविरत सुरु असल्याने हे मंदिर महिला सक्षमीकरणाचे विद्यापीठच ठरले आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले. इंग्रजा विषयी बापूंच्या विचार व मतांवर विनोबा प्रभावित होऊन दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम त्यांच्यासाठी मातृस्थान बणले. बापूंनीच त्यांचे नाव विनोबा असे ठेवून १९२१ मध्ये आश्रमातील संचालनाची जबाबदारी सोपविली.
तेव्हापासून विनोबांनी शिक्षण, ग्रामोद्योग, कुष्ठसेवा, चर्मोद्योग, भंगीकाम, सूतकताई, बुनाई, अध्ययनासह रचनात्मक कार्यात अनेक प्रयोग केले. त्यांची साहित्य निर्मितीही मोठी आहे. १९३०-१९३१ मध्ये गीताई गीताचा मराठीत अनुवाद करुन घराघरात गीताई पोहोचवली. १९३८ मध्ये ते पवनारला वास्तव्यास आले. याच ठिकाणी त्यांनी कांचनमुक्तीचा प्रयोग यशस्वी केला. महिलांसाठी १९५९ मध्ये ब्रम्हविद्या मंदिरची स्थापना केली.
जगात स्त्रियांचे शोषण आणि उपेक्षितांचे जीवन कायम असल्याने त्यांच्या समस्येच्या निराकरणासाठी या मंदिरातून प्रयत्न सुरु केलेत. भूदान चळवळ विनोबांच्या जीवनातील महत्वपूर्ण ठरली. १९५१ मध्ये तेलंगणा मधील पोचमपल्ली गावात दलीतांसाठी कसायला जमिन मागितली असता एका व्यक्तीने शंभर एकर जमीन दानात दिली.याच घटनेने भूदान चळवळीचा पाया घातल्या गेला.
६५ हजार किमीची पदयात्रा करुन ४२ लाख एकर जमीन मिळविली. या जमीनीचे भूमिहीनांना वाटप करून स्वालंबनाचा मार्ग दाखविला. अशा या महात्म्याची शुक्रवारी १२५ जयंती कोरोनायनामुळे साध्यापद्धतीने साजरी होणार आहे.
आश्रमात सामूहिक निर्णयाला महत्त्व
सध्या २५ स्त्रिया आणि २ पुरूष आश्रमात आहे. कुणीही प्रमुख नसून सर्व मिळून काम करतात. सामूहिक निर्णयाला महत्त्व दिल्या जाते. आश्रमात तीनतास शारीरिक व तीनतास मानसिक श्रम केल्या जाते. जीवन जगण्यासाठी जेवढ्या पैशाची गरज असते, तेवढे श्रम केले पाहिजे. सर्वांना समान मजूरी मिळाली पाहिजे. आश्रमात २५ मार्च हा स्थापना दिवस, विनोबांजींची जयंती मित्र मिलन आणि १५ नोव्हेंबर निर्वाण दिन आदी कार्यक्रम गावकऱ्यांकडून आयोजित केले जाते. आश्रमात दिवाळीला सप्ताहाचे आयोजन करुन शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. पण कोरोना प्रादुभार्वामुळे यावर्षी कार्यक्रमावर बंधने असल्याचे मत कांचन बहन यांनी व्यक्त केले.