समाज मेळाव्यातून सामाजिक समस्यांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:26 AM2018-02-07T00:26:53+5:302018-02-07T00:28:06+5:30

देशात आज अनेक समस्या डोके वर काढत असताना त्यांची झळ सर्वच समाजांना पोहोचत आहे. आर्थिक कोंडी, उपवर मुला-मुलींचे विवाह, परस्परांपासून दुरावलेली मने, शैक्षणिक समस्या, समाज एकत्रिकरण आदी अनेक समस्या आहे.

Brainstorm on social issues through social gathering | समाज मेळाव्यातून सामाजिक समस्यांवर मंथन

समाज मेळाव्यातून सामाजिक समस्यांवर मंथन

Next
ठळक मुद्देतिरळे कुणबी वर-वधू परिचय मेळाव्याचा सूर : अन्य समस्यांवरही तोडगा काढण्याची व्यक्त केली गरज

ऑनलाईन लोकमत
पुलगाव : देशात आज अनेक समस्या डोके वर काढत असताना त्यांची झळ सर्वच समाजांना पोहोचत आहे. आर्थिक कोंडी, उपवर मुला-मुलींचे विवाह, परस्परांपासून दुरावलेली मने, शैक्षणिक समस्या, समाज एकत्रिकरण आदी अनेक समस्या आहे. समाजातील एकटा घटक आलेल्या समस्यांना तोंड देऊ शकत नाही. यासाठी समाज मेळाव्यातून सामाजिक समस्यांवर मंथन होऊन उपवर वर-वधूसह अन्य समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे, असा सूर तिरळे कुणबी समाज मेळाव्यातून निघाला.
स्थानिक तिरळे कुणबी समाज सेवा संघातर्फे तिरळे कुणबी वधू-वर परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या विदर्भस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वर्धा येथील ओंकार धावडे तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश सावरकर, निवृत्त कर्मचारी पेन्शन १९९५ या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पुंडलिक पांडे, प्रभाकर शहाकार, प्राचार्य राजेंद्र येवले, पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे, नितीन कोठे, गणपत चौधरी महाराज, अ‍ॅड. छाया छांदे, अशोक निकम, पं.स. सदस्य पल्लवी ढोक, रूपराव ठाकरे, विकास ढोक, संघाचे अध्यक्ष प्रशांत डफळे, तिवरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका तथा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुंडलिक पांडे, रमेश सावरकर, प्रभाकर शहाकार, मुरलीधर बुराडे, पल्लवी ढोक, आदींनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत डफळे यांनी प्रास्ताविकातून समाजातर्फे बांधण्यात येणाºया संत शिरोमणी तुकाराम महाराज समाज मंदिरासाठी जागा दान दिल्याची माहिती देत समाजकार्याची माहिती दिली. यावेळी समाजातील अनेक दात्यांनी मदतीचा हात पूढे केला.
मेळाव्याला शेकडो पालक व उपवर मुला-मुलींची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक उपवर मुला-मुलींनी आपला परिचय देत योग्य जीवनसाथी निवडीचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजा भवानी, संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा मार्ल्यापण, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. संचालन अरविंद उगले यांनी केले तर उपस्थितांचे आभार संगीता कुडे यांनी केले. याप्रसंगी स्वराश्रम कलामंचचे सुनील कुडे यांनी सुगम संगीत सादर केले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता शरद येंडे, प्रशांत कुडे, आशिष भोयर, रणजीत काकडे, चंद्रकांत भोयर, सुशांत बिरे, दिनेश गावंडे, राजेंद्र दरणे, नंदकिशोर मोहोड, दिनेश खेडकर, राजू वानखेडे, सतीश पांडे, दामोदर गोतमारे, महादेव भोयर, विनोद भेंडे, विजय भांडे, महेश भोयर, सचिन चौधरी, संजय गावंडे, गोरे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.
मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका व दिनदर्शिकेचे विमोचन
तिरळे कुणबी समाज सेवा संघातर्फे आयोजित उपवर वर-वधू व पालक परिचय मेळाव्यात स्मरणिका तथा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात वर-वधू तथा पालकांची माहिती दिली आहे.

Web Title: Brainstorm on social issues through social gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.