बौद्ध पौर्णिमेस होणाऱ्या प्राणी प्रगणनेला ब्रेक; कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 02:42 PM2020-04-25T14:42:37+5:302020-04-25T14:43:07+5:30
बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून ७ व ८ मे रोजी पाणस्थळावरील होणारी प्रगणना स्थगित करण्यात आली आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्व•ाूमीवर यंदा ७ व ८ मे रोजी बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून होणाºया प्राणी प्रगणनेला स्थगिती देण्यात आली आहे. तशा लेखी सूचनाही बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या असून सदर आदेश विभागीय वनअधिकारी (वन्यजीव), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस. बी. भलावी यांनी २३ एप्रिलला निर्गमित केला आहे.
निसर्गप्रेमी तसेच वन्यजीव प्रेमींसाठी बौद्ध पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी त्यांच्याकडून अधिकृत नोंदणी करून जंगलात उभारलेल्या मचाणावर राहून वन्यजीवांची माहिती घेतली जाते. शिवाय त्यांना विविध वन्यजीवांचे दर्शनही होते. मात्र, सध्या कोरोना या विषाणूने भारत देशात नव्हे तर जगात थैमान घातले आहे. इतकेच नव्हे तर या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. या विषाणूची लागण वन्यजीवांना होऊ नये. तसेच कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये म्हणून बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून ७ व ८ मे रोजी पाणस्थळावरील होणारी प्रगणना स्थगित करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु, पाणस्थळावरील प्रगणनेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालण होणे कठीण असल्याचे कारण पुढे करून प्रगणना स्थगित करण्यात आली आहे.
वन्यजीवप्रेमी मचाणावर राहून घेतात निसर्गानुभव
बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून होणाºया प्राणी प्रगणनादरम्यान जंगलात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या मचाणींवर राहून वन्यजीवप्रेमी निसर्गअनुभव घेतात. या मचाणांवर स्वयंसेवक, कर्मचारी, एक पर्यटक राहतात. परंतु, हा निसर्गअनुभव घेताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे कठीण असल्याने पाणस्थळावरील प्रगणना स्थगित करण्यात आली आहे.
बोर व्याघ्रमध्ये सलग दोन वर्षे झाली नाही प्रगणना
बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून वन्य प्राण्यांची प्रगणना होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, २०१९ मध्ये तसेच २०१८ मध्ये व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांची संख्या नेमकी किती याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठीची ही प्रक्रिया पूर्णत्त्वास गेली नाही. सदर दोन्ही वर्षी ही प्रगणना एच्छिक करण्यात आली होती, त्यामुळे सदर प्रक्रिया पूर्णत्त्वास गेली नाही असे सांगण्यात येते.