कृपलानीचे अतिक्रमण तोडा; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:22 AM2019-02-07T00:22:31+5:302019-02-07T00:23:13+5:30

पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नागपूर मार्गावर कृपलानी यांनी अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम करीत अतिक्रमण केले आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात नगरपालिकेला डझनभर पत्र देण्यात आले. परंतू कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने येत्या सात दिवसांत कृपलाणीचे अतिक्रमण तोडावे .......

Break the encroachment of Kripalani; Otherwise the movement | कृपलानीचे अतिक्रमण तोडा; अन्यथा आंदोलन

कृपलानीचे अतिक्रमण तोडा; अन्यथा आंदोलन

Next
ठळक मुद्देशिवा संघटनेची मागणी : पालिकेला दिला सात दिवसांचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पालिकेची कोणतीही परवानगी न घेता नागपूर मार्गावर कृपलानी यांनी अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम करीत अतिक्रमण केले आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात नगरपालिकेला डझनभर पत्र देण्यात आले. परंतू कारवाईकडे कानाडोळा होत असल्याने येत्या सात दिवसांत कृपलाणीचे अतिक्रमण तोडावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे शहर कार्यालयीन मंत्री सुरेश पट्टेवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी यांनी पालिकेची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या इमारतच नाही तर हॉटेलचीही निर्मिती केली. कृपलानीच्या या अतिक्रमीत इमारतीमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने व्युमेन्स ऐज्युकेशन सोसायटीतील सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनी पालिकेकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली. तसेच अ‍ॅड. रविंद्र गुुरु यांनी जिल्हाधिकारी प्रशासन व नगरपालिकेला ८० सेक्शन अन्वये व ३०४ सेक्शन अन्वये दोन वेळा नोटीस दिली.
सोबतच सुरेश पट्टेवार यांनीही १६ नोव्हेंबरपासून या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करीत आहे. परंतू नगरपालिका प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही. कृपलानीच्या या अतिक्रमीत इमारतीमुळे केसरीमल शाळेतील अडीच हजार विद्यार्थिनींच्या जिवाला धोका असून तात्काळ हे अतिक्रमण पाडावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुरेश पट्टेवार यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाºयांसह जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
शहरातील मार्केट परिसरातील सर्वसामान्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करणाºया मुख्याधिकारी धनदांडग्या कृपलाणीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. १० जानेवारीच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्याधिकारी आता मौन पाळून आहे. शहरात दबंग अधिकारी म्हणून मुख्याधिकाऱ्यांची ओळख असतानाही ८२ दिवस लोटूनही कारवाई झाली नसल्याने ही दंबगगिरी कशामुळे शांत झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे. नगररचनाकार नेरकर यांची अचानक सातारा येथे बदली करण्यात आली. त्या पाठोपाठ मुख्याधिकाऱ्यांची बदली होणार का? असे अनेक प्रश्न पट्टेवार यांनी निवेदनातून विचारले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळेच्या समोर १०० मीटर परिसरात शांतता झोन असल्याने तेथे व्यावसायिक वापर करता येत नाही. परंतु कृपलाणी यांनी शाळेसमोरच मोठे हॉटेले विनापरवानगी उभारुन न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली आहे. तसेच नगरपालिकेने कारवाई करण्याची गरज असताना पालिकाही दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करण्याकरिता पालिकाही सहकार्य करीत असल्याचे दिसून येते, असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Break the encroachment of Kripalani; Otherwise the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.