शेतातील विहिरीवर बसविलेल्या सौरकृषीपंपात बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:00 AM2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:02+5:30
विलास रामदास दुपारे यांच भालेवाडी शिवारात शेत आहे. त्यांनी शासकीय योजनेतून अनुदान तत्त्वावर सौरकृषीपंपासाठी सीआरआय कंपनीकडे अर्ज केला होता. मार्च महिन्यात शेतातील विहिरीत सौरकृषीपंप बसविण्यात आला. एससी प्रवर्गासाठी पाच टक्के रक्कम अदा करायची होती. व त्यावर ९५ टक्के शासकीय अनुदान होते. कंपनीकडून आलेल्या पंप इलेक्ट्रिशियनने विहिरीवर सौरकृषीपंप बसवून दिला. आणि काही दिवसांत हा पंप सुरु होईल असे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : शासकीय अनुदानावर घेतलेल्या सौरकृषीपंप सुरु न झाल्याने तसेच सुरु होताच त्यातून केवळ एक इंचच पाणी बाहेर येत असल्याने सीआरआय कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली असून तत्काळ दुसरा सौरकृषीपंप बसविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी विलास दुपारे यांनी केली आहे.
विलास रामदास दुपारे यांच भालेवाडी शिवारात शेत आहे. त्यांनी शासकीय योजनेतून अनुदान तत्त्वावर सौरकृषीपंपासाठी सीआरआय कंपनीकडे अर्ज केला होता. मार्च महिन्यात शेतातील विहिरीत सौरकृषीपंप बसविण्यात आला. एससी प्रवर्गासाठी पाच टक्के रक्कम अदा करायची होती. व त्यावर ९५ टक्के शासकीय अनुदान होते. कंपनीकडून आलेल्या पंप इलेक्ट्रिशियनने विहिरीवर सौरकृषीपंप बसवून दिला. आणि काही दिवसांत हा पंप सुरु होईल असे सांगितले.
परंतु, कृषीपंप सुरु झाला नाही. याबाबत महावितरणच्या अभियंत्यांना कळविण्यात आले तसेच शेतकरयाने सीआरआय कोर्इंबतूर कंपनीकडेही सौरपंप सदोष असल्याबाबतची लेखी तक्रार दिली.
त्यानुसार महावितरणचे कर्मचारी पंप दुरुस्तीसाठी शेतात आली त्यांनी पंप सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र,ज्या गतीने विहिरीतील पाणी बाहेर फेकल्या जाणार असे सांगितले होते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधीच नापिकी आणि त्यात ओल्या दुष्काळामुळे हताश शेतकऱ्यावर आता मोठे संकट कोसळले अ
ओलीताचा प्रश्न बिकट
रब्बी हंगामात शेतातील पिकाला पाणी कशा प्रकारे ओलीत करायचे. हा यक्ष प्रश्न सध्या शेतकरी विलास दुपारे यांना पडला आहे. सौरकृषीपंपात बिघाड झाल्याने तत्काळ दुसरा कृषीपंप बसविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोनोगाव येथील एका शेतकऱ्याचीही अशीच फसवणूक झाल्याने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याबाबत महापारेषण कंपनीने तत्काळ दखल घेत फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱी विलास दुपारे यांनी केली आहे.