जलपर्णीमुळे कोंडलाय तलावाचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:47 AM2018-09-03T00:47:07+5:302018-09-03T00:48:45+5:30

शहराकरिता जीवनदायिनी ठरलेल्या गाव तलावाला जलपर्णींसह झाडे-झुडुपांंनी वेढा दिला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यभरात शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करुन जलसंधारण व जलस्त्रोत बळकटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

Breathing of the Kondalai lake due to waterfalls | जलपर्णीमुळे कोंडलाय तलावाचा श्वास

जलपर्णीमुळे कोंडलाय तलावाचा श्वास

Next
ठळक मुद्देसमुद्रपूरच्या गाव तलावाचे अस्तित्वच धोक्यात : जीवनदायिनी ठरलेल्या तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : शहराकरिता जीवनदायिनी ठरलेल्या गाव तलावाला जलपर्णींसह झाडे-झुडुपांंनी वेढा दिला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यभरात शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करुन जलसंधारण व जलस्त्रोत बळकटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरुन स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असतानाही नगरपंचायतीला मात्र तलावाच्या पुनर्जीवनाच्या कामाचा विसर पडल्याचा आरोप होत आहे.
शहरातील बाजार समितीच्या मागच्या बाजूस असलेल्या या गाव तलावाची निर्मिती जवळपास पन्नास वर्षापूर्वी जनपत सभेच्या कालखंंडात झाली आहे. तब्बल दहा ते बारा एकर जागेत हा तलाव विस्तारलेला आहे. आठवडी बाजारात बैल व गुराच्या खरेदी-विक्रीकरिता येणाऱ्या बाजारकरु आणि गुरांची तहाण याच तलावातून भागविली जात होती. आता हाच गाव तलाव दुर्लक्षितपणाचा बळी पडत आहे. मागील तीन दशकापासून बेशरमच्या झुडपांनी वेढलेला आहे. तसेच या तलावाचा गाळही उपसला नसल्याने तो पुर्णत: बुजलेला आहे. तसेच तलाव्या पाळी जमीनदोस्त झाल्याने या तलावाचे सौदर्यही धोक्यात आले असून हा तलाव शहरासाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. तलावाचे महत्व लक्षात घेऊन मागील अनेक वर्षापासून या तलावाला पुनर्जीवीत करण्याचे प्रस्ताव प्रशासन दरबारी घेण्यात आले. मात्र गेल्या पन्नास वर्षाच्या काळात एकदाही या तलावाची स्वच्छता करुन गाळ उपसण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. या तलावात ३० वर्षापूर्वी मत्स्य व्यवसाय करून भोयी समाज स्वत: चा उदरनिर्वाह करीत होते.पण, या वीस वर्षाच्या काळात या तलावात पाण्याचा थेंबही दिसत नाही. यामुळे गावातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्वी गावातील महिला या तलावाच्या पाण्याचा वापर कपडे धुण्याकरिता करीत होत्या. तलावात पाणी साचत असल्याने गावातील घरगुती आणि सार्वजनिक विहिरींची पाण्याची पातळी टिकून राहत होती.पण मागील काही वर्षात गावातील विहिरींनी तळ गाठले आहे. तलावात गाळ साचून झाडे-झुडुपांनीही वेढा दिल्याने या तलावाचा श्वास कोंडला आहे. या तलावात पाणी साठविले जात नसल्याने गावातील पाण्याची पातळी खालावत आहे. गावातील सामाजिक कार्य करणाºया मंडळींनी बरेचदा या तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी ग्रामप्रशासनाकडे मागणी केली आहे. परतु ती मागणीही ग्रामप्रशासनाच्या दप्तरी कित्येक वर्षापासून खितपत पडलेली आहे. गावासाठी महत्वाचा असलेल्या तलावाचे खोलीकरण व स्व्च्छता केली तर गावातील पाण्याची पातळी वाढून गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल व काहींना रोजगारही मिळेल.
राजकीय कलहामुळे आलेला निधी गेला परत
मागील २ वर्षापूर्वी ग्रामपंचायतीकडे तलावाच्या सौदर्यीकरणाकरिता निधी उपलब्ध झाला होता.पण राजकीय कलहामुळे हा निधी परत गेला. त्यामुळे या तलावाचा श्वास कोंडलेलाच आहे. नगरपंचायतीत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने या तलावाच्या पुनर्जीवितेसाठी पदाधिकाºयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्याकडून तलावाचा गाळ काढून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

तलाव पुनर्जिवीत करण्याचे काम नगर पंचायतीच्यावतीने प्रस्तापित आहे. मात्र या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. या संदर्भात आमदार समीर कुणावार यांनी पाठपुरावा केला आहे.निधी मिळण्याची संभावना आहे.सदर कामासाठी २ कोटी निधीची गरज आहे. अनुलोम सामाजिक संस्थेच्या वतीने तलावाचे खोलिकरण व गाळ उपसण्याचे काम प्रस्तावित काम आहे.
- स्वालिहा मालगावे, प्रशासकीय अधिकारी, नगर पंचायत, समुद्रपूर.

गाव तलाव खोलिकरणाचा मुद्दा सभागृहात कित्येकदा मांडला. सत्ताधाºयांनी गांभीर्याने घेतले नाही .त्यामुळे ‘गाळमुक्त तळ व शिवारयुक्त तळ’ या कार्यक्रमा अंतर्गत अनुलोम संस्थेच्या पदाधिकाºयांना भेटून योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. सदर काम प्रस्तावित आहे.
- आशिष अंड्रस्कर, नगरसेवक.

Web Title: Breathing of the Kondalai lake due to waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.