लग्नात नववधू बहिणीला भावाने आंदणात दिली ‘गाय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:35 PM2018-05-14T22:35:13+5:302018-05-14T22:35:30+5:30
तालुक्यातील रेहकी येथील चेतन मनोहर घुमडे यांचा शुभ विवाह उमरेड येथील प्रियंका विठोबा बेले यांच्याशी रविवारी झाला. लग्नसमारंभात आलेल्या आप्तेष्टांनी वेगवेगळ्या भेटवस्तू वधूला आंदनात दिल्या; परंतु जुन्या परंपरागत चालिरितींला उजाळा देत मानलेल्या भावाने बहिणीला भेटस्वरुपात गाय दिल्याने ही अनोखी भेट सदर लग्न सोहळ्यात चर्चेचा विषय ठरली.
प्रफुल्ल लुंगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील रेहकी येथील चेतन मनोहर घुमडे यांचा शुभ विवाह उमरेड येथील प्रियंका विठोबा बेले यांच्याशी रविवारी झाला. लग्नसमारंभात आलेल्या आप्तेष्टांनी वेगवेगळ्या भेटवस्तू वधूला आंदनात दिल्या; परंतु जुन्या परंपरागत चालिरितींला उजाळा देत मानलेल्या भावाने बहिणीला भेटस्वरुपात गाय दिल्याने ही अनोखी भेट सदर लग्न सोहळ्यात चर्चेचा विषय ठरली.
विवाह सोहळ्यात वर-वधूला नातेवाईकांसह आप्तेष्ट अनेक स्वरुपाच्या भेटवस्तू देतात. त्यांचा संसार सुखाचा होवो अशीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. परंतु त्या भेटवस्तूत भौतिक वस्तुंचाच समावेश असतो. मात्र याला अपवाद ठरले ते येथील उमरेड चेतन व प्रियंका यांचा विवाह सोहळा.. ! सदर लग्न सोहळ्यात प्रियंकाचा मानलेला भाऊ प्रकाश मुळे याने बहिणीला भेटस्वरुपात चक्क गाय आंदन दिली.
प्रकाश मुळे यांचा दुधाचा व्यवसाय आहे. ते वधूपिता विठोबाजी बेले यांच्याकडे दररोज दूध पोहचविण्यासाठी यायचे. तेव्हा प्रियंका ही त्यांच्याकडून दूध घेताना त्यांना भाऊ म्हणून हाक मारायची. दोघांतही जिव्हाळ्याचे संबंध होते. सासरी बहिणीला दूध घेताना आपली आठवण यावी म्हणून प्रकाशने प्रियंकाच्या लग्नात चक्क गायच भेटस्वरुपात दिली. भेटस्वरुपात दिलेल्या गायीला झुल टाकून सजवीत प्रकाश मुळे यांच्याकडून प्रियंकाताईस सप्रेम भेट असे लिहिले होते. लग्नसमारंभात सजवलेली गाय आंदनात बघून वºहाडी मंडळींना आश्चर्याचा धक्काच बसला. वधूला आंदनात गाय मिळत आहे म्हणून हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी अनेकांनी तिथे गर्दी केली होती. जुन्या परंपरागत चालिरितींना उजाळा देत मानलेल्या भावाने बहिणीला भेटस्वरुपात दिलेली गाय वºहाडी मंडळींकरिता चचेर्चा विषय ठरला.
आंदनात मिळालेली गाय घेऊन जेव्हा वरात गावात आली. तेव्हा रेहकी वासियांना सुद्धा ही भेटवस्तू पाहून आश्चर्यच झाले. हा प्रकार नव्या पिढीकरिता जरी आश्चर्याचा असला तरी पूर्वीच्या काळी लग्नसमारंभात अशाच प्रकारे भेटवस्तू मिळत असल्याच्या आठवणींना या निमित्ताने पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.