बेलगाव येथील अतिवृष्टीमुळे पूल गेला वाहून; अनेक मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:28 AM2023-07-22T11:28:53+5:302023-07-22T11:30:09+5:30

हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह ते अल्लीपूर मार्ग यशोदा नदी प्रवाहामुळे कालपासून बंद आहे. प

Bridge swept away due to heavy rains in Belgaon; Many ways off | बेलगाव येथील अतिवृष्टीमुळे पूल गेला वाहून; अनेक मार्ग बंद

बेलगाव येथील अतिवृष्टीमुळे पूल गेला वाहून; अनेक मार्ग बंद

googlenewsNext

वर्धा : तालुक्यातील बेलगाव येथे काल रात्री झालेल्या पावसामुळे नदीवरील पुल पूर्णपणे वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह ते अल्लीपूर मार्ग यशोदा नदी प्रवाहामुळे कालपासून बंद आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.

सेलू तालुक्यातील धानोली मेघे ते बेलगाव या गावांना जोडणाऱ्या लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहून गेला आहे. या मार्गावरून फारशी वाहतूक होत नाही. मार्गाचा वापर शेतकरी व मजूर मुख्यत्वे करतात. पर्यायी मार्ग तीनशे मीटर अंतरावर महामार्गावरून उपलब्ध आहे.

Web Title: Bridge swept away due to heavy rains in Belgaon; Many ways off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस