शकुंतलाचा मार्ग ब्रॉडगेज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:49 PM2018-11-22T21:49:41+5:302018-11-22T21:50:23+5:30
ब्रिटीश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगांव ते आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करावे. तसेच आर्वी ते वरुड नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केंंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ब्रिटीश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगांव ते आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करावे. तसेच आर्वी ते वरुड नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केंंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
केंद्र व राज्य शासनाने २०१४ नंतर संयुक्तरित्या पुलगांव ते आर्वी रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या प्रकल्पाला कॅपीटल इन्वीसमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून बजेटमध्ये स्थान दिले. त्या सोबत आर्वी ते वरुड या नवीन रेल्वेमार्गाला प्रथमच मंजूरी प्रदान करण्यात आली. हे दोन्ही महत्वपुर्ण प्रकल्प वर्धा तसेच संपुर्ण विदर्भाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. त्यामुळे या कामांना प्रशासकीय स्तरावरुन गती देण्याकरिता रेल्वेमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करावे. तसेच डिसेंबर २०१८ मध्ये संसदेच्या अधिवेशनास प्रारंभ होणार असून या अधिवेशन काळात आढावा बैठक आयोजित करण्याची विनंती खासदार रामदास तडस यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दिलेल्या पात्रातून केली आहे. या दोन्ही प्रकल्पाकरिता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते सकारात्मक असून लवकरच या दोन्ही प्रकल्पांना गती मिळणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे.